३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात शिवप्रेमींसाठी राज्य शासन सज्ज

रायगड : यावर्षी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५०वा शिवराज्याभिषेक सोहळा ६ जूनला मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येणार आहे. खारघर येथे उष्माघातामुळे झालेला प्रसंग पुन्हा उद्भवू नये यासाठी शासन आरोग्यविषयक पुरेपूर खबरदारी घेणार आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगडावर १० हजार लीटर तसेच पायथ्याशी ४० हजार लीटर पाणीसाठा उपलब्ध करण्यात आला आहे.


शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत आहेत. या कार्यक्रमांना मिळणारा प्रतिसाद पाहता शिवराज्याभिषेकादिवशी रायगडावर प्रचंड गर्दी पाहायला मिळेल. हीच बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने उपस्थितांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष पाऊले उचलली आहेत.


शिवराज्याभिषेकाला लाखो शिवप्रेमी रायगडावर येतील त्यामुळे त्यांचा ऊनापासून बचाव करण्यासाठी रायगडाच्या पायथ्यापासून ते रायगडापर्यंत एकूण २४ वैद्यकीय मदत कक्ष उभारण्यात आले आहेत. रायगडावर चढताना त्रास होऊ नये यासाठी दीड लाख पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्सची व्यवस्था केली जाणार आहे. सोबतच अत्यावश्यक सेवेसाठी रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्या आहेत. शिवभक्तांना आरामासाठी खाटांचीही सोय करण्यात आलेली आहे. पर्यटकांसाठी कोंझर, वालुसरे, पाचाड येथे वाहन पार्किंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. येथे एकाच वेळी साडेतीन हजार वाहने पार्क करता येतील.


"फक्त उष्माघातापासून बचाव म्हणून नाही तर येणार्‍या शिवप्रेमींना इतरही काही त्रास होत असेल तर त्याकरिता ३५० डॉक्टरांचा चमू पायथ्यापासून ते गडापर्यंत सेवेसाठी सज्ज असेल", अशी माहिती रायगड जिल्हा आरोग्य प्रशासनाचे अधिकारी सुधाकर मोरे यांनी दिली. तसेच प्रत्येक शिवप्रेमीने आपल्याजवळ एक पाण्याची बोटल ठेवावी व डोक्याला रुमाल बांधावा किंवा टोपी, कॅप, हॅट घालावी जेणेकरुन ऊनापासून संरक्षण होईल, असा सल्लाही त्यांनी दिला.


कोणताही दुर्घटना होऊ नये यासाठी शिवप्रेमींच्या सुरक्षिततेकरता जवळपास २ हजार पोलीस तैनात करण्यात आहेत. तसेच गडावर १०९ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. या सर्व खबरदारीमुळे येणार्‍या शिवभक्तांना कोणतीही काळजी न करता जल्लोषात साजर्‍या होणार्‍या शिवराज्याभिषेकाचा आनंद घेता येणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai Seaplane : मुंबई-रत्नागिरी सी-प्लेन सेवेला वेग; कोकण पर्यटनासाठी मोठे पाऊल

मुंबई : कोकणातील पर्यटनाला नवी चालना देण्यासाठी मुंबई (Mumbai) आणि रत्नागिरीदरम्यान (Ratnagiri) सी-प्लेन सेवा सुरू

Matsya Sampada Yojana : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ अधिकाधिक मच्छिमारांपर्यंत पोहोचवा; नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची (Matsya Sampada Yojana) प्रभावी अंमलबजावणी करून राज्यातील अधिकाधिक मच्छिमारांना

Vadkhal Bypass : वडखळ बायपासची दुरवस्था; अपूर्ण कामातच टोलवसुलीमुळे वाहनचालक संतप्त

रायगड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ बायपासची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, पावसाळ्यात हा

Matheran's Honeymoon Point : माथेरानच्या हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन; सीसीटीव्हीत थरारक दृश्य कैद

रायगड : माथेरानच्या प्रसिद्ध हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण

Kokan Railway : प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद; 16 जुलैपासून इंटरसिटी, डेक्कन क्वीन पुन्हा रुळावर

रायगड : मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये वाढलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेता अतिरिक्त गाड्या

Dapoli Mahabaleshwar highway : दापोली–पोलादपूर–महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गासाठी प्रवीण दरेकरांची गडकरींकडे मागणी

मुंबई : दापोली–पोलादपूरमार्गे महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी देण्याची मागणी भाजपचे गटनेते तथा आमदार