मी भाजपची पण भाजपा माझी थोडीच! : पंकजा मुंडे

नवी दिल्ली : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने दिल्लीत आज राष्ट्रीय समाज पक्षाकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रासप अध्यक्ष महादेव जानकर, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली. यावेळी पंकजा मुंडे यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. विशेष म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी 'पंकजाताईंच्या पक्षामुळं समाजाचं हित नाही' असं वक्तव्य केलं. त्यावर पंकजा मुंडे यांनीदेखील प्रत्युत्तर दिलं.

यावेळी महादेव जानकरांना उद्देशून पंकजा मुंडे म्हणाल्या, "तुम्ही म्हणताय ताईची पार्टी ताईची पार्टी. माझी कुठली पार्टी? मी भाजपची आहे, पण भाजपा माझी थोडीच आहे. भाजप खूप मोठा पक्ष आहे. मी भाजपची होऊ शकते. पक्ष माझा होऊ शकत नाही. कारण तो मोठा पक्ष आहे", असं धक्कादायक विधान मुंडे यांनी केलं आहे.

"मला भीती वाटत नाही. कशाचीच भीती वाटत नाही. भीती न वाटणं हे आमच्या रक्तातच आहे. कशाची चिंता नाही. काही नाही मिळालं तर मी ऊस तोडायला जाईन. महादेव जानकर जातील मेंढ्या चरायला, आणखी काय होईल? आम्हाला काही गमवायचंच नाही. आम्हाला आयुष्यात कोणत्या गोष्टीची लालसा, आस्था, अपेक्षा नाहीच", असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

पंकजा मुंडेंनी या कार्यक्रमात जानकर यांच्याशी असलेल्या भावा-बहिणीच्या नात्यावर भाष्य करताना त्यांच्या अविवाहितपणावर मिश्किल टिप्पणी केली. त्या म्हणाल्या “महादेव जानकरांनी तर लग्नच केलेलं नाही. खूप चांगलं काम केलं त्यांनी. मी तर म्हणेन यामुळे ते नशीबवान आहेत. यामुळे ते समाजासाठी पूर्णपणे झोकून देऊन काम करू शकतात. आमचाही नेता चहा विकता विकता बनला की प्रधानमंत्री. माझंही लक्ष राष्ट्रीय समाज पक्षावर आहे. हा पक्ष माझ्या भावाचा आहे. तसेच राष्ट्रीय समाज पक्ष हे माझं माहेर आहे. वडिलांशी लढाई झाली तर भावाच्या घरात जाईन", असं देखील सूचक वक्तव्य पंकजा मुंडे यांनी यावेळी केलं.

महादेव जानकर आज लग्नच करतायत की काय!


“महादेव जानकर आज अशा सुटाबुटात आले, मला तर वाटलं आज लग्नच करतायत की काय. मला नेहमी वाटतं की कधीतरी मला फोन करतील आणि मला म्हणतील उद्या माझं मंदिरात लग्न आहे, तुम्ही या, तुम्ही त्या कार्यक्रमाच्याही अध्यक्ष आहात. मुंडेंच्या निधनानंतर त्यांनी हे जाहीर करून टाकलं की ३१ मे चे त्यांच्या पक्षाचे जेवढे कार्यक्रम असतील, त्या कार्यक्रमांना मीच अध्यक्ष असेन”, अशी मिश्किल टिप्पणीही यावेळी पंकजा मुंडेंनी केली.
Comments
Add Comment

मोठा अपघात टळला; फर्रुखाबादमध्ये खाजगी विमानाचा अपघात

फर्रुखाबा : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील विमान तळावर आज सकाळी एका खासगी विमानाचा

विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली.

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी