पंकजाताईंच्या वक्तव्याचा नेहमी विपर्यास, त्यांना म्हणायचं होतं की...

  113

नागपूर: पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असून पंकजाताई भाजप माझ्या पाठिशी आहे, असंच म्हणाल्या, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांन केलं आहे. 'मी भाजपची आहे, पण भाजप पक्ष थोडीच माझा आहे', असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केल्यानंतर चर्चांना उधाण आलं. त्यानंतर आता बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


ते म्हणाले की, पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा संपूर्ण विपर्यास आहे. मी त्यांचं संपूर्ण भाषण ऐकलेलं आहे. पंकजाताई यांनी भाजपबद्दल बोलताना पक्ष माझ्या पाठीशी आहे असे वक्तव्य केले आहे. पंकजाताई भाजपच्या नेत्या आहेत. त्यांच्या बोलण्याचा नेहमीच विपर्यास केला जातो. पंकजाताई ज्या पद्धतीने महाराष्ट्रात फिरत आहेत, पक्षाच्या जनसंपर्क अभियानात त्या सहभागी झाल्या आहेत. मध्यप्रदेशात त्यांच्या अनेक सभा होत आहेत. त्यामुळे कोणत्याही विषयाला धरुन त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात संभ्रम निर्माण करणे चूक आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी नेहमी बोलत असतो. त्या थोडंही बोलल्या तर त्याचा विपर्यास केला जातो असं मला वाटतं.



आमचा पक्ष महासागर


भाजपमधील इनकमिंगविषयी बावनकुळे म्हणाले. आमचा पक्ष महासागर आहे, अरबी समुद्रासारखा आहे. या महासागरामध्ये कितीही लहान, कितीही मोठा, कोणत्याही पक्षातला नेतृत्व आला तरी आमच्याकडे खूप स्पेस आहे. आमच्याकडे समाजातील प्रत्येक घटकासाठीचे वेगवेगळे सेल आहेत. पस्तीस प्रकोष्ठ आहे. किसान आघाडी, महिला आघाडीसारख्या नऊ आघाड्या आहेत. ४८ लोकसभेच्या आणि विधानसभेच्या २८८ जागा युती म्हणून लढायच्या आहे. त्यामुळे कोणीही पक्षात आला तरी त्याच्या क्षमतेप्रमाणे त्याला काम देण्यासाठी आमच्याकडे स्पेस आहे, जागा आहे. ज्या ज्या पक्षातील ज्या ज्या नेत्यांना भाजपमध्ये यायचं असेल, माझी त्यांना विनंती आहे, त्यांनी भाजपमध्ये यावं आम्ही महासागरासारखं त्यांना सामावून घेऊ," असं बावनकुळे यांनी म्हटलं.



'राज्यातील तीन कोटी कुटुंबांशी संपर्क साधणार'


३० मे ते ३० जून आम्ही जनसंपर्क अभियान चालवत आहोत. केंद्राचे अनेक नेते अभियानात महाराष्ट्रात येणार आहेत. महाराष्ट्रातील नेते प्रत्येक मतदारसंघात जाऊन संपर्क साधणार आहेत. या अभियानाच्या माध्यमातून आम्ही राज्यातील तीन कोटी कुटुंबांना संपर्क करणार आहोत. हे आमचा घर चलो अभियान आहे, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या अभियानाबाबत दिली.

Comments
Add Comment

चंद्रपूरातील नाल्याच्या संरक्षण भिंतीचे प्रकरण विधानसभेत गाजले!

मुंबई: चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात हवेली गार्डन ते आकाशवाणी रोडवरील नाल्याच्या संरक्षण भिंतीच्या

कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दरवर्षी करतात सहा हजाराहून अधिक वारकऱ्यांची सेवा

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा, विठ्ठल मळ्यात जपलीय परंपरा..! १६ वर्षांची परंपरा; ४० दिंड्यांतील सहा हजार

Prasad Tamdar Baba : अंग चोळून अंघोळ अन् शरीरसंबंध; भोंदूबाबा प्रसादचे हायटेक कारनामे उघड

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील भोंदूबाबाच्या कारनाम्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. मोबाईलच्या

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर

Eknath Shinde: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी बांधवांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले 

मराठी पर्यटकांशी फोनवरून संवाद साधत, त्यांना शक्य ती सारी मदत पोहचवण्याची ग्वाही मुंबई: उत्तराखंडमध्ये