मुंबई: गायक, दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांचा ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाता पहिलाच शो राज ठाकरे यांच्या हजेरीने गाजणार आहे. यात राज ठाकरे यांनी केलेली फटाकेबाजी पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाचा प्रोमो समोर आला होता. आता, या कार्यक्रमाचा ट्रेलरही समोर आलाय.
प्रोमोमध्ये राज ठाकरे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. तर, आता ट्रेलरमध्ये थेट शरद पवारांनाच लक्ष्य केलं आहे. झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर खुपते तिथे गुप्तेच्या भागाचा प्रोमो शेअर केला होता. या प्रोमोमध्ये राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांची मिमिक्रीही केली होती. इतकंच नाही तर त्यांनी त्यांचा लेक पार्थ पवार यांच्यावरुनही टोला लगावला होता. आता या कार्यक्रमातील आणखी काही भाग प्रदर्शित झाला आहे. त्यात, राज ठाकरे यांनी थेट शरद पवारांवरच निशाणा साधला आहे.