सचिन आणि संझगिरी उलगडणार काही सुवर्णक्षणांच्या स्मृती

  213

२ जून रोजी कार्यक्रमाचे आयोजन


मुंबई (वार्ताहर) : क्रिकेट विश्वामध्ये आपले विशिष्ट स्थान निर्माण करणारा गोलंदाजांचा कर्दनकाळ सचिन तेंडुलकर आणि त्याच्यासारख्या कैक यशस्वी खेळाडूंच्या पराक्रमाचा 'आँखो देखा हाल' क्रिकेट शौकिनांपर्यंत आपल्या खास शैलीत पोहोचविणारे द्वारकानाथ तथा पप्पू संझगिरी हे २ जून २०२३ रोजी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहाच्या मंचावर पाहावयास मिळणार आहेत. सचिनने नुकताच म्हणजे २४ एप्रिल रोजी आपला ५०वा वाढदिवस साजरा केला. त्याची साधारण अडीच दशकांची कारकिर्द संझगिरींनी अगदी जवळून पाहिली आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून सचिनची 'गोल्डन ज्युबिली' साजरी करण्याचे संझगिरी यांनी योजिले आहे.


संझगिरी यांनी 'शतकात एक सचिन' हे क्रिकेट महानायकावर एक पुस्तक लिहिले असून त्याचे 'सिन्टिलेटिंग सचिन - स्टोरी बियाँड स्टँटस' असे इंग्रजीत रुपांतर केले आहे. ही दोन्ही पुस्तके ग्रंथालीने प्रकाशित केली आहेत. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, धडाडीचे सलामीवीर अंशुमन गायकवाड, यष्टीरक्षक किरण मोरे, वेगवान गोलंदाज झहीर खान, कसोटीपटू तसेच प्रशिक्षक प्रवीण अमरे, जाहिरात जगातील अग्रेसर प्रल्हाद कक्कर, नामवंत पार्श्वगायक शान, अभिनेते प्रशांत दामले, अभिनेता सुमीत राघवन, विनोदवीर विक्रम साठे, हृषिकेश जोशी, शल्यविशारद डॉ. अनंत जोशी, क्रीडा समालोचक हर्षा भोगले असे अनेक अग्रगण्य या समारंभाचे आकर्षण असणार आहेत. हे सारे आपापले अनुभव आणि खास करून या दोन व्यक्तिमत्त्वांशी निगडीत कथा-किस्से ऐकविणार आहेत.चार वेगवेगळ्या भागांमध्ये हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

Comments
Add Comment

हॉकी एशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तानचा संघ भारतात येणार ?

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील गेल्या काही महिन्यांपासून तणावाच्या पार्श्वभूमीवर क्रीडा मंत्रालयातील

ENG vs IND: शुभमन गिलने द्विशतक ठोकत रचला इतिहास, कोहलीचा रेकॉर्ड मोडला

एजबेस्टन: इंग्लंडविरुद्ध एजबेस्टन कसोटीत कर्णधार शुभमन गिलचा जलवा पाहायला मिळत आहे. शुभमन गिलने भारताच्या

ENG vs IND: शुभमन गिलचे शतक, पहिल्या दिवशी भारत तीनशेपार

एजबेस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून एजबेस्टनच्या मैदानावर खेळवला जात आहे. या

UAE मध्ये आशिया चषक क्रिकेट स्पर्धा

अबुधाबी : आशिया चषक क्रिकेट स्पर्धा संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएई येथे होणार असल्याचे वृत्त आहे. आशियाई

Ind vs Eng: भारत वि इंग्लंड दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरूवात

मुंबई: कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत

Mohammad Shami: कोलकाता उच्च न्यायालयाकडून मोहम्मद शमीला मोठा झटका

नवी दिल्ली: कोलकाता उच्च न्यायालयाकडून क्रिकेटर मोहम्मद शमीला मोठा झटका बसला आहे. उच्च न्यायालयाने शमीला त्याची