पाच विकेट्स राखत चेन्नईची पाचव्यांदा बाजी

अहमदाबाद : पावसामुळे अडकलेला चेन्नई सुपर किंग्ज व गुजरात टायटन्स या दोन तगड्या संघांमधील आयपीएलचा अंतिम सामना काल नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला आणि अखेरीस चेन्नईने आयपीएलच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. महाविजेतेपद पटकावत धोनीच्या संघाने आयपीएलमध्ये पाचव्यांदा बाजी मारली आहे.


रविवारी पावसामुळे रद्द झालेला अंतिम सामना सोमवारी वेळेवर सुरू झाला. मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये पावसाने गोंधळ घातल्याने जवळपास तीन तासांचा खेळ वाया गेला. पंचांनी दोन ते तीन वेळा खेळपट्टीची पाहणी केली. त्यानंतर सामना खेळवण्याचा निर्णय घेतला. डकवर्थ लुईसच्या नियमानुसार चेन्नईला विजयासाठी १५ षटकात १७१ धावांचे नवीन टार्गेट देण्यात आले होते.


शेवटच्या षटकात रवींद्र जडेजाने कमालीची खेळी केली आणि चेन्नईला विजय मिळवून दिला. चेन्नई संघाला विजयासाठी शेवटच्या षटकात १३ धावांची गरज होती. गुजरातकडून शेवटच्या षटकात गोलंदाजीची जबाबदारी मोहित शर्माकडे सोपवण्यात आली होती. मोहितने पहिल्या चेंडूवर एकही धाव दिली नाही. यानंतरच्या तीन चेंडूंवर जडेजाने सलग एक-एक धाव काढली.


शेवटच्या चेंडूवर मात्र दमदार चौकार ठोकत चेन्नईनं अंतिम सामना जिंकला. एमएस धोनीसारख्या शैलीत खेळत त्याने शेवटच्या २ चेंडूत १० धावांची गरज असताना एक षटकार आणि एक चौकार मारून चेन्नई सुपर किंग्जला पाचव्यांदा इंडियन प्रीमियर लीग जेतेपदावर नेले.

Comments
Add Comment

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलचं पहिलं शतक! 'गन सॅल्यूट' करत केले सेलिब्रेशन

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताची घट्ट पकड, राहुल, जुरेल आणि जडेजाने ठोकले शतक

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वेस्ट

IND vs WI: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, पहिल्याच दिवशी विंडीजचा संपूर्ण डाव कोसळला

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र