२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाईंडचा मृत्यू

लाहोर (वृत्तसंस्था): टेरर फंडिग प्रकरणात पंजाबच्या शेखपुरा तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आणि २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या अब्दुल सलाम भुट्टावी याचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू झाला. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असून भारताच्या गुप्तचर यंत्रणांनीही भुट्टावीच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.


भुट्टावी याला २०२०मध्ये लष्कर-ए-तोएबाचा प्रमुख हाफिज सईदचा मेहुणा अब्दुल रहमान मक्कीसह साडे १६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात तसेच २०११ मध्ये, यूएस ट्रेझरी डिपार्टमेंटने देखील त्याच्यावर निर्बंध लादले होते. त्याच्यावर दहशतवादी हल्ल्यांसाठी निधी उभारण्याचा आणि दहशतवाद्यांची भरती केल्याचा आरोप होता. भुट्टावीने आपली भाषणे आणि फतवे जारी करून दहशतवाद्यांना मुंबईवर हल्ला करण्यासाठी तयार केले होते. २०११ मध्ये भुट्टावीने दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोएबासाठी २० वर्षे काम केल्याची कबुली दिली होती.


२०१२ मध्ये, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने भुट्टावीला दहशतवादी घोषित केले. २००२-२००८च्या दरम्यान, जेव्हा लष्कर-ए-तोएबाचा प्रमुख हाफिज सईदला पाकिस्तानमध्ये ताब्यात घेण्यात आले, तेव्हा भुट्टावी दहशतवादी संघटनेचा प्रमुख बनला. त्याचवेळी २००८ मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. १० दहशतवाद्यांनी मिळून हा हल्ला केला होती. या हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला होता.

Comments
Add Comment

Operation Sagar Bandhu | ‘ऑपरेशन सागर बंधू’ जोरात; श्रीलंकेत भारताचे मदतकार्य वेगाने सुरू

नवी दिल्ली : श्रीलंकेत चक्रीवादळ ‘दितवाह’मुळे मोठ्या प्रमाणात विनाश झाला . मुसळधार पावसाने आणि भूस्खलनामुळे

इजिप्तमध्ये सापडले तीन हजार वर्षांपूर्वीचे ‘सोन्याचे शहर’

उत्खननात सोने वितळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीच्या भट्ट्यांचा समावेश कैरो : जगभरातील

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष

इस्लामाबाद : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला असून पाकिस्तानमधील चमन आणि

अमेरिकेसाठी होणार सोशल मीडिया खात्यांची तपासणी; १५ डिसेंबरपासून नियम

न्यूयॉर्क : अमेरिकेत जायचे असेल, तर सोशल मीडियावर जपून पोस्ट करणे गरजेचे आहे. कारण, अमेरिकन व्हिसा मिळवताना सोशल

'बब्बर खालसा'ला ब्रिटन सरकारचा दणका

लंडन  : खलिस्तानवादी दहशतवादी संघटना बब्बर खालसाच्या आर्थिक नाड्या आवळल्यास ब्रिटन सरकारने सुरुवात केली. या

ट्रम्प प्रशासनाचे नवे धोरण अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांसाठी गैरसोयीचे

वॉशिंग्टन डीसी : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन हे दोन दिवस भारताच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात अनेक