पूंजीसाठी बाहेरगावी गेलेला मजूर आता गावाच्या दिशेने


  • वामन दिघा



मोखाडा : मोखाडा तालुक्यातील गाव-पाड्यांत मूबलक पाणी, रोजगार निर्मितीची साधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने तालुक्यातील नागरिकांना आजही रोजगारासाठी शहरांची वाट धरावी लागत आहे. अनेक निवडणुका आल्या आणि गेल्या; परंतु रोजगारनिर्मितीची कामे वाढण्याऐवजी कमी होत चालली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात शेतीच्या कामासाठी पुरतील, एवढे तरी पैसे आपल्याकडे असावेत, यासाठी बाहेरगावी गेलेला मजूर आता गावाकडे परतू लागला आहे.



महागाईवर नियंत्रण नसल्याने भल्याभल्यांचे कंबरडे मोडले असून, आदिवासी कुटुंबांना आपले घर व गाव-पाडे, नातेवाइकांना सोडून भिवंडी, ठाणे, कुडूस, कल्याण, अंबाडी इत्यादी शेकडो मैल दूरवर रोजगाराच्या शोधात भटकंती करावी लागते. ज्या शहरांच्या ठिकाणी हाताला काम मिळेल, तेथे काम संपेपर्यंत आपल्या कुटुंबातील सदस्यांसह पडाव करावा लागतो, कारण उन्हाळ्यात जर कामधंदा केला नाही, दोन पैसे कमाविले नाही, तर पावसाळ्यातील शेती करायची कशी?, असा प्रश्न या कुटुंबातील सदस्यासमोर असतो. त्यामुळे आपल्या मुलांबाळांच्या शिक्षणांची तमा न बाळगता पोटाची खळगी भरण्यासाठी व पावसाळ्यातील शेतीच्या कामासाठी पैसे शिल्लक पडावेत यासाठी वीटभट्टी, इमारत बांधकाम, रस्त्याची साईडपट्टी आदी कामांत दिवसभर कडक उन्हा-तान्हात हाताला मिळालेले काम त्यांना पूर्ण करावे लागत आहे. महागाईच्या काळात २५६ रुपये प्रतिदिन शासकीय मजुरीतून आपला व आपल्या कुटुंबाचा रहाटगाडा चालवायचा की दोन पैसे शेतीच्या कामासाठी शिल्लक ठेवायचे? असा प्रश्न आहेच.


निवडणुका येतात आणि जातात, पण मायबाप सरकार व लोकप्रतिनिधी स्थानिक पातळीवर पुरेशा प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देत नसल्याने पावसाळा काळातील शेतीच्या कामासाठी व कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी स्थलांतरित व्हावे लागते, अशी खंत ग्रामीण भागांतील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Vasai Accident : आईच्या हातातून निसटलं अन् दुचाकीवरून पडून एक वर्षाच्या बाळाचा मृत्यू, वसईतील दुर्घटना

पालघर : वसईतील नायगाव (Vasai Accident) परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत दुचाकीवरून पडल्याने एक वर्षाच्या बाळाचा मृत्यू

Vasai : रुळावर उभा राहून ट्रेन अडवण्याचा प्रयत्न? वसई-नालासोपारा दरम्यान लोकल थांबली प्रवशांना सुटला घाम!

पालघर: वसई-नालासोपारा रेल्वे स्थानकांदरम्यान पश्चिम रेल्वे मार्गावर बुधवारी एक धक्कादायक घटना घडली. एका

Flood Relief Maharashtra : पालघर, वसई-विरार पूरग्रस्तांना राज्य सरकारची विशेष मदत; घरांसाठी 1.5 लाख, कुटुंबाला 10 हजार रुपये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय; पूरग्रस्त, शेतकरी, मच्छीमार, दुकानदार आणि

Nalasopara News : नागेला तलाव पुन्हा ठरला जीवघेणा! 18 वर्षीय तरुणाचा बळी, सुरक्षेअभावी नागरिक आक्रमक

नालासोपारा : नालासोपारा पूर्व भागातील नागेला तलावात (Nagela Lake) बुडून १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक

Palghar : अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या पालघरची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनी केली पाहणी

पालघर : पालघर जिल्ह्यात २२ ते २४ जुलै २०२६ या कालावधीत झालेल्या विक्रमी अतिवृष्टीमुळे सार्वजनिक रस्ते, पूल आणि

Palghar Rain : मुंबई-गुजरात रेल्वे सेवेवर पावसाचा मोठा परिणाम; वंदे भारत, शताब्दीसह अनेक गाड्या रद्द

पालघर : पालघर जिल्हा आणि गुजरातमधील वलसाड (Valsad) परिसरात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) जोर सलग दुसऱ्या दिवशीही कायम आहे.