लाफ्टर डोस विथ बिट सेन्सिटिव्हिटी

Share
  • मुक्तहस्त: अश्विनी पारकर
असं म्हणतात, लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. पण, आपल्या आयुष्याच्या अडचणींत हे मेडिसिन आपल्याला देणाऱ्या आणि ताण हलका करणाऱ्या कलाकारांचं आयुष्यही अडचणींनी भरलेलं असतं हे विसरून कसं चालेल?

या तीन दिवसांत मालिकाविश्वाने तीन कलाकारांची एक्झिट पाहिली वैभवी उपाध्याय, नितीश पांडे आणि आदित्य सिंह राजपूत. तीनही कलाकारांच्या मृत्यूचे कारण वेगवेगळे होते. पण त्यात एक धागा समान होता तो म्हणजे जीवनाची क्षणभंगूरता. जी ग्लॅमर क्षेत्रात मुख्यत्वे जाणवते.

तीनही कलाकारांचे मृत्यू मनाला चटका लावून जाणारे होते. मुख्यत्वे तिघांचीही एक्झिट तरुण वयातीलच होती. कलाकार म्हटले की त्यांच्याविषयी अफवा आणि गॉसिप्स आपसूकच आल्या. आजकालच्या ‘मीडिया ट्रायल’ आणि सोशल मिडियावरील ट्रोलिंगच्या दुनियेत प्रेक्षकांची या कलाकारांविषयी असलेली असंवेदनशीलता वेळोवेळी दिसून आली आहे. आदित्यच्या मृत्यूनंतर त्याने आत्महत्या केली तसेच त्याचा मृत्यू ड्रग ओव्हरडोसमुळे झाल्याच्या बातम्या आहेत. या बातम्या म्हणजे अफवा असून या अफवांमुळे त्याच्या कुटुंबीयांना व मित्रपरिवाराला प्रचंड त्रास झाल्याचे त्याच्या आईने व अनेक मित्रांनी म्हटले आहे. त्याच्या घरातील कामवाल्या बाईने तसेच अनेक मित्रांनी तसेच सहकलाकारांनी त्याच्या मृत्यूचे जे कारण सर्वांसमोर मांडले त्यानुसार, आदित्य दोन दिवस सतत आजारी होता. बाथरुममध्ये त्याला चक्कर आली अन् तो पडला. त्याच्या डोक्याला मार लागल्याचे म्हटले आहे.

आदित्यने ड्रग्ज घेतले की नाहीत. त्याचा मृत्यू कशामुळे झाला? हे अजूनही स्पष्ट व्हायचे आहे. पोलीस त्याचा अधिक शोध करत आहेत पण कलाकारांच्या बाबतीत दाखवली जाणारी असंवेदनशीलता यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर येत आहे. आदित्य सिंह राजपूत यातील सिंह राजपूत हे आडनाव असणारा सुशांत सिंह राजपूत याची न्यूज चॅनलवरील मीडिया ट्रायल सर्वांनी चवीने पाहिली आहे. त्यावेळी न्यूज चॅनल हे एंटरटेनमेंट चॅनेलपेक्षाही मनोरंजक ठरले होते. सेलिब्रिटिज आणि त्यांचे ड्रग अॅडिक्शन यावर आधी एकदा एका वेबसाइटसाठी लिहलेल्या लेखात ड्रग्ज घेणं हा गुन्हा असला तरी ड्रग्ज घेणं ही मानसिक समस्या असून त्याकडे त्या दृष्टिकोनातूनच पाहिले जाणे गरजेचे आहे, असे लिहिले होते, त्याची पुन्हा एकदा आठवण होते आहे. मालिकाविश्व असो किंवा बॉलिवूड ग्लॅमरच्या स्पर्धेत येणाऱ्या फस्ट्रेशनवर मात करण्यासाठी नियमित व्यायाम, धूम्रपान, मद्यपान न करणारे कलाकार विरळच आहेत. अभिनेता अक्षय कुमार या बॉलिवूड सेलिब्रिटीचे यात नाव नक्कीच लिहिता येईल. सुशांत सिंह प्रकरणात दीपिका पदुकोण या अभिनेत्रीचेही ड्रग्ज सेवन करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये नाव आले होते. दीपिका मध्यंतरीच्या काळात डिप्रेशन या तिला झालेल्या मानसिक आजाराबद्दल बोलली होती.

डिप्रेस आपण प्रत्येकजण कधी ना कधी तरी होतो. पण आपण किती काळ डिप्रेस आहोत, यावर ते डिप्रेशन आहे की नाही, हे अवलंबून असते. मानसोपचार तज्ज्ञांकडे याचे निदान करण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या असतात. त्यामुळे ज्याही वेळा आपल्याला असे वाटते की, आपल्याला मदतीची गरज आहे, त्यावेळी धैर्य ठेवून मदतीचा हात मागणे ही पहिली आणि महत्त्वाची पायरी असते. दीपिकासारखे सेलिब्रिटी यावर बोलत आहेत. त्यामुळे अनेकांना याबाबत पुढे यायची प्रेरणा मिळेल, हे नक्की.

या मृत्यू झालेल्या तीन सेलिब्रिटींमध्ये वैभवी उपाध्याय हिचीही एक्झिट चटका लावणारी आहे. वैभवी हिची साराभाई वर्सेस साराभाई मालिकेतील भूमिका सर्व प्रेक्षकांना खळखळून हसवणारी होती. नियतीचा विरोधाभास खरंच विचार करायला लावणारा आहे. कलाकार नितीन पांडे याचाही मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. हृदयविकारात मानसिक ताण- तणाव प्रचंड कारणीभूत असतो. वैभवी हिचा मृत्यू अपघातात झाला. ज्यात तिचं ज्याच्याशी लग्न ठरलं होतं तो सुखरूप वाचला. वैभवीही त्यात वाचली असती, तर आज तिनं आपल्याला आणखी खळखळून हसवलं असतं.

जगाला खळखळून हसवणारा असाच एक कलाकार म्हणजे चार्लिन चॅप्लिन. त्याच्या हसरं दु:ख नावाच्या आत्मचरित्रात त्याच्या हसऱ्या चेहऱ्यामागे असलेलं भलं मोठं दु:ख सांगितलं आहे. त्याची सिनेमातील विनोदी दृश्यातही तो एखाद्या अडचणीमध्ये सापडलेला असतो. त्यात तो जे काही करतो ते पाहून आपल्याला हसायला येते. त्याने दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटांतही एखाद्या दु:खद घटनेत अथवा अडचणींमध्ये विनोद कसा निर्माण होतो, हे दाखवण्यात आलेले आहे. हे खरं तर त्याच्या आयुष्याच्या अनुभवांतून आलेलं जीवनाचं मर्म आहे, जे तो आपल्याला दाखवतो.

असं म्हणतात, लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. पण, आपल्या आयुष्याच्या अडचणींत हे मेडिसिन आपल्याला देणाऱ्या आणि आपल्या आयुष्यातला ताण हलका करणाऱ्या कलाकारांचं आयुष्यही आपल्यासारखंच अडचणींनी भरलेलं असतं हे विसरून कसं चालेल? त्यातही ते आपल्याला हसवण्याचा आणि मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे गॉसिप्स आपल्याला कितीही आवडत असले तरीही एक माणूस म्हणून आपण आपल्यातील संवेदनशीलता नक्कीच जागृत ठेवू शकतो आणि कलाकारांच्या प्रति थोडे संवेदनशील होऊ शकतो.

Recent Posts

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

16 minutes ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

44 minutes ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

1 hour ago

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

6 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

7 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

7 hours ago