बोईसर स्थानकात प्रवाशांचा रूळ ओलांडून जीवघेणा प्रवास

बोईसर : बोईसर रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक दोन ते एक या स्थानकांच्या दरम्यान प्रवास करणारे अनेक प्रवासी पश्चिम भागात जाण्यासाठी रेल्वे रुळांवर उड्या मारुन लोहमार्ग पोलिसांची भीती न बाळगता रूळ ओलांडून जीवघेणा प्रवास करत आहेत. इतकेच नव्हे, तर ट्रेनमध्ये विरुद्ध दिशेने जीवावर बेतू पाहणारी प्रवाशांची चढ-उतार लोहमार्ग पोलिसांच्या समोर होत असताना प्रवासी सुरक्षेबाबत सपशेल दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.



बोईसर पश्चिमेस तारापूर एमआयडीसी, नागरी वसाहती, अणुऊर्जा प्रकल्प तसेच अनेक लघुउद्योग आहेत. या ठिकाणी रोज ये-जा करणाऱ्यांची संख्या दोन ते पाच लाखांच्या घरात आहे. मागील अनेक महिन्यांपासून प्रवासी अशा पद्धतीने प्रवास करत असताना रेल्वे सुरक्षा दलाचे जवान, लोहमार्ग पोलीस, तिकीट तपासणीस याविषयी कोणतीही कारवाई करताना दिसत नसल्याने प्रवाशांनाही बळ मिळत आहे. याबाबत अनेक जागरूक प्रवासी मात्र वारंवार तक्रारी करत आहेत.



रेल्वे मार्गात उडी मारुन गटार, दगडी खडी, लोखंडी गज ओलांडताना जर पायाला ठेस लागली व विपरित घटना घडली आणि त्याच वेळी एखादी ट्रेन आली, तर प्रवाशाच्या जीवावर बेतण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. संध्याकाळच्या वेळेत, तर विदारक चित्र पाहावयास मिळत असते. या गर्दीच्या वेळेत सर्रासपणे प्रवासी झुंडीच्या झुंडीने रेल्वे मार्ग ओलांडून ये-जा करत असतात.



‘त्या’ प्रवाशांवर कारवाईची मागणी...
रेल्वे स्थानकात लिफ्ट, स्कायवॉक, इच्छित स्थळी जिने असताना प्रवासी हा जीवघेणा प्रवास करत असल्याने अनेक जागरूक पनागरिक याविषयी नाराजी व्यक्त करत आहेत. रेल्वे सुरक्षा दलाचे जवान याविषयी कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. फलाट क्रमांक एकवर स्थानक व्यवस्थापक, लोहमार्ग पोलीस ठाणे आहे. तरीही रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली जात नाही. तरी प्रवाशांच्या सुरक्षेबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.



रेल्वे मार्गात फलाट दोन आणि एक यांच्यामध्ये लोखंडी जाळीचे अडथळे निर्माण करणे गरजेचे आहे. जेणेकरून कुठलाही प्रवासी अशा प्रकारची कृती करणार नाही. मात्र सुरक्षेच्या बाबतीत येथील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारचे सोयरसुतक नसल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे.

Comments
Add Comment

जव्हारमध्ये बनावट धनादेश प्रकरणातील आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी

पालघर : सार्वजनिक बांधकाम विभाग, जव्हार कार्यालयातील बनावट धनादेश प्रकरणात अटक केलेल्या आरोपींना पुन्हा पोलीस

बविआतून आलेल्यांना तिकीट देऊ नका

भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा नेतृत्वाला इशारा विरार : महानगरपालिकेच्या सत्तेसाठी बहुजन विकास आघाडीतून (बविआ)

नगराध्यक्ष हरले, मात्र जिल्हाध्यक्ष जिंकले

जिल्ह्यात भाजपचे ९४ पैकी ५० नगरसेवक गणेश पाटील पालघर: पालघर जिल्ह्यात तीन नगर परिषद आणि एका नगरपंचायतीच्या

भाजप नेत्यांचे ‘रायगड’वर विचारमंथन

टिळक भवनात आज काँग्रेसची खलबते वसई : वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया

मच्छीमारांच्या सर्वांगीण सर्वेक्षणाला गती

वाढवण बंदर प्रकल्प: जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार पालघर : प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या

कुडूसला स्वतंत्र पोलीस ठाण्याचा दर्जा

५२ गावांच्या सुरक्षिततेसाठी गृहविभागाची मंजुरी वाडा : वाडा तालुक्यातील औद्योगिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि ५२