नव्या संसद उद्घाटन वादाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्याच्या निर्णयाला १९ विरोधी पक्षांनी विरोध केला होता. याविरोधात आर. जयासुकिन यांनी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. कार्यक्रम मंडळाचे प्रमुख हे पंतप्रधानच असतात आम्ही त्यामध्ये हस्तक्षेप करु शकत नाही, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे.


नव्या संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे, यासाठी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेमध्ये राष्ट्रपती या देशाचे प्रथम नागरिक असून संविधानाच्या अनुच्छेद ७९ नुसार संसद भवनाचा महत्त्वाचा भाग आहेत, असं नमूद करण्यात आलं होतं. तसेच लोकसभा सचिवालयाने घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचं देखील या याचिकेमध्ये म्हटलं होतं.


आर. जयासुकिन यांनी काल ही जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यांनी त्यांच्या या याचिकेमध्ये म्हटलं होतं की, "देशाच्या संविधानाचे प्रमुख म्हणून राष्ट्रपती पंतप्रधानांची निवड करतात. तसेच अनेक महत्त्वाचे निर्णय राष्ट्रपतींच्या नावाने घेतले जातात." मात्र आता ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.


यानंतर याचिकाकर्ते पुन्हा हायकोर्टात जातील अशी शक्यता सरकारी वकीलाने व्यक्त केली होती. मात्र आम्ही हायकोर्टात जाणार नाही, अशी ग्वाही याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली.

Comments
Add Comment

महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीसह देशातील वीस मुलांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’

नवी दिल्ली : वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील वीस मुलांना

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील कारची डीएसपींना धडक

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे एक धक्कादायक घटना घडली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यातील एका

राष्ट्रपती मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार आहेत. नियोजीत कार्यक्रमानुसार राष्ट्रपती

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले