ज्येष्ठ समाजवादी नेते रविंद्र वैद्य यांचे निधन

जव्हार : ज्येष्ठ समाजवादी नेते, पत्रकार रवींद्र वैद्य यांचे शुक्रवारी रात्री साडेबारा वाजता जव्हार येथे देहावसान झाले. ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काल गुरुवार, २५ मे रोजी त्यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांचे सुपुत्र संदीप (जव्हारचे माजी नगराध्यक्ष) यांनी त्यांना जव्हार येथील कॉटेज रुग्णालयात दाखल केले. परंतु मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन विवाहित कन्या, मुलगा संदीप, सून, नातवंडे असा परिवार आहे.


प्रजा समाजवादी पक्ष सुरु करुन आदिवासींच्या विकासासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केलं. दत्ता ताम्हाणे यांच्या प्रेरणेतून जव्हार, वाडा, मोखाडा, विक्रमगड, तलासरी भागात आदिवासींच्या विविध प्रकारच्या समस्यांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. गोवा व दमण मुक्ती आंदोलन व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग होता.


साप्ताहिक आहुती बरोबरच मुंबई येथील नवशक्ती दैनिकाचे बातमीदार म्हणून त्यांनी काम केले. राजकारणाबरोबरच मराठी पत्रकारितेत त्यांनी आपला ठसा उमटविला होता. ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे सक्रिय सदस्य म्हणून त्यांनी काम केले. आणीबाणीच्या काळात त्यांनी दोन वर्षे कारावास भोगला होता.


१९९७ साली त्यांच्या पत्नी सौ. नीला यांचे निधन झाले. त्यानंतर रवींद्र वैद्य यांची प्रकृती ढासळत होती. यातूनही गेल्या आठवड्यात ते एका कार्यक्रमासाठी मुंबई येथे आले होते. मात्र काल फारच प्रकृती खालावल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले व तिथेच त्यांचे निधन झाले.

Comments
Add Comment

Nilesh Rane : गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील कोकण वासियांसाठी १२ सप्टेंबरला दादर ते कुडाळ मोफत विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था

आमदार निलेश राणे यांचा सालाबाद प्रमाणे उपक्रम मालवण : गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या

Dhule : जंगलात आढळले तरुण-तरुणीचे मृतदेह, धुळ्यात नेमकं काय घडलं ?

Dhule : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. साक्री तालुक्यातील आदिवासी पश्चिम

Anna Bansode : अनधिकृत बांधकामाबाबत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करा अण्णा बनसोडे यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (KUADA) कार्यक्षेत्रातील विनापरवाना व अनधिकृत बांधकामांवर

Sukhbir Singh Badal Attack : धक्कादायक! नांदेडमध्ये पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला; सुरक्षा कर्मचारीही जखमी

नांदेड : शिरोमणी अकाली दलाचे  (Shiromani Akali Dal) राष्ट्रीय अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल (Sukhbir Singh

Moshi Building Collapse : मोशी दुर्घटनेत पतीचा मृत्यू; महिन्याभरात पत्नीसोबत घडला असा प्रकार...

पिंपरी-चिंचवड : मोशी कचरा डेपो दुर्घटनेत (Pune Moshi) पतीचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या महिन्याभरात 23 वर्षीय पत्नीने गळफास

Crime News : धुळे जिल्हा परिषदेचा फिटर खासगी एजंटसह जळगाव एसीबीच्या जाळ्यात

Crime News : जळगाव एसीबीकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षकांची सुरक्षा रक्षक मंडळात नोंदणी करण्यासह