मुंबईतील २०११ पूर्वीच्या झोपडीधारकांना फक्त अडीच लाखात मिळणार घर

शिंदे फडणवीस सरकारचा सशुल्क पुर्नवसनाचा निर्णय


मुंबई : मुंबईतील झोपडपट्टीमधील झोपडीधारकांना आता फक्त अडीच लाखात घर मिळणार असल्याची अधिकृत घोषणा राज्य सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.


मुंबईतील झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसन सदनिकेच्या घरांची किंमत ही आता अडीच लाख निश्चित करण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन आदेशही काढण्यात आला आहे. हा निर्णय १ जानेवारी २००० ते १ जानेवारी २०११ या कालावधीतील झोपडपट्टीधारकांसाठी लागू होणार आहे. त्यामुळे आता त्यांचे मुंबईतील घरांचे स्वप्न साकार होणार आहे.


सशुल्क पुनर्वसन योग्य झोपडीधारकांच्या पुनर्वसन सदनिकेचे शुल्क निश्चित करण्यासाठी गृहनिर्माण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीने केलेल्या शिफारसींना मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत सशुल्क पुनर्वसन सदनिकेचे शुल्क निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


त्यानुसार गृहनिर्माण विभागाच्या १६ मे २०१८ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींनुसार झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत सशुल्क पुनर्वसन योग्य झोपडीधारकांच्या पुनर्वसन सदनिकेची किंमत रु. २.५ लाख (अडीच लाख) इतकी निश्चित करण्यात येत आहे. यासंदर्भात आवश्यक अटी व शर्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई यांनी शासनाच्या पूर्वमान्यतेने निश्चित कराव्यात”, असे सरकारने स्पष्ट केले आहे.


राज्य सरकारच्या गृहनिर्माण मंत्रालयाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, “झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत १ जानेवारी २००० ते १ जानेवारी २०११ पर्यंत अस्तित्वात असलेल्या झोपडीच्या संदर्भात अशा झोपडीत प्रत्यक्ष राहणाऱ्या झोपडीधारकांचे सशुल्क पुनर्वसन करण्याचे धोरण शासनाने १६ मे २०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये स्विकारले आहे.”

Comments
Add Comment

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या