संजय राऊतांची चाटूगिरीत पीएचडी : नितेश राणे

  178

मुंबई : नव्या संसदेच्या उद्घाटनावर बहिष्कार घालणार्‍यांना सडेतोड प्रत्युत्तर देत भाजप आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला. संजय राऊत यांच्या नावाचा पूर्ण उल्लेख सतत करण्याबाबत नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत दुसर्‍यांबद्दल बाप चोरणारी टोळी असं म्हणतात पण यांना स्वतःच्या वडिलांबद्दल कितपत माहिती आहे? त्यांना त्यांच्या वडिलांची आठवण व्हावी म्हणून मी संजय राजाराम राऊत असा उल्लेख करतो.


पुढे ते म्हणाले की, "संजय राऊतांनी चाटूगिरीमध्ये पीएचडी केली आहे. कधी ते राष्ट्रवादीची चाटूगिरी करतात, कधी काँग्रेसची आणि वेळ मिळाला तर उद्धव ठाकरेंची चाटूगिरी करतात. संजय राऊतांनी सध्या काँग्रेसची चाटूगिरी करण्याचा उच्चांक गाठला आहे. संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार घालण्याचा काँग्रेसने जो निर्णय घेतला आहे, तो किती योग्य आहे, हेच सध्या संजय राऊत पटवून देत आहेत. आदिवासी राष्ट्रपती महिलेवर अन्याय होतोय, असं वारंवार सांगण्याचं काम चाटूगिरीचे प्रमुख संजय राऊत करत असतात".


काँग्रेसला आदिवासी महिला असलेल्या द्रौपदी मुर्मूंबद्दल एवढाच पुळका येत असेल, तर राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांच्याविरोधात काँग्रेसने उमेदवार का दिला?, असा सवाल नितेश राणेंनी केला. काँग्रेसच्या एका नेत्याने राष्ट्रपतींचा 'राष्ट्रीय पत्नी' असं संबोधून अपमान केला होता. मग तेव्हा राहुल गांधी व त्यांच्या अन्य चमच्यांनी त्या नेत्याचा जाहीर निषेध का केला नाही? तो नेता आजही काँग्रेसमध्ये आहे, असं नितेश राणे म्हणाले.


देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या काँग्रेसच्या होत्या. त्यावेळी त्यांनी भारतात आणीबाणी लागू केली होती व विरोधकांना जेलमध्ये टाकत हुकूमशाही केली होती. संजय राऊत व उद्धव ठाकरेंचा ज्या काँग्रेसच्या मांडीवर बसून नंगा नाच सुरु आहे त्या काँग्रेसने आपल्या देशामध्ये मुस्काटदाबी करण्याचं काम केलेलं आहे, असा आरोप नितेश राणेंनी केला.


दरम्यान, नवी दिल्लीतील नव्या संसद भवनाच्या उभारणीवरही खासदार संजय राऊत यांनी आक्षेप घेतला आहे. नवीन संसद भवन बांधण्याची गरज काय, जुने संसद भवन अजून देखील चांगल्या स्थितीत आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यावर नितेश राणे म्हणाले, राऊत हे नेहमी पंतप्रधान मोदी आणि राज्यपाल यांच्यावर टीका करतात. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून कसे बाहेर पडतील, यासाठी संजय राऊत दिवस रात्र प्रयत्न करत आहेत.


प्रत्येक गोष्टीला संजय राऊतांचा विरोध असतो, यांच्याइतका मोठा देशद्रोही नाही. राऊत जर असतील तर बाळासाहेबांच्या स्मारकाचं काम पूर्ण होणार नाही, त्यामुळे तुम्हाला झेपत नसेल तर याची जबाबदारी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीसांकडे सोपवा, असं म्हणत मुंबईत सध्या सुरु असलेल्या विकास कामांचा आढावा यावेळी नितेश राणेंनी घेतला.

Comments
Add Comment

जरांगेंच्या नेतृत्वात हजारो समर्थक मुंबईत धडकणार, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

मुंबई : मराठा आरक्षण प्रश्नी समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्यासह हजारो समर्थकांचे मोर्चा उद्या, शुक्रवारी मुंबईत

दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप

मुंबई : दीड दिवसांच्या गणरायांना साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. गणरायाच्या निरोपाला रिमझिम पावसाच्या सरी

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदतवाढ

मुंबई : २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील विविध शैक्षणिक संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी

'राज को राज रहने दो' असं का म्हणाले एकनाथ शिंदे ?

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या घरी जऊन

सचिन तेंडुलकर सहकुटुंब लालबागच्या राजा चरणी लीन

राज ठाकरेंच्या निवासस्थानीही घेतले दर्शन मुंबई : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुंबईत गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात

म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज करायला मुदतवाढ

मुंबई : म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, वसई (जि. पालघर) येथील विविध