नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) : केंद्रातील मोदी सरकारला २६ मे रोजी ९ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने भाजपने महिनाभरापासून देशभर जनसंपर्क अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पक्षाच्या वतीने ३० मे ते ३० जून या कालावधीत देशभरात सुमारे ५० रॅली काढण्याची योजना आखली आहे. या सभांमध्ये पंतप्रधान मोदी आणि अनेक भापचे बडे नेते सभांना संबोधित करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर ३० मे २०१९ रोजी पंतप्रधान मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमामुळे भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीलाही चालना मिळणार आहे. ३१ मे रोजी राजस्थानमधील अजमेर येथे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते जनसंपर्क अभियानाचा शुभारंभ होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ यांच्यासोबतच इतर केंद्रीय मंत्री आणि नेतेही या जनसंपर्क अभियानाचा भाग असणार आहेत. दरम्यान, २७ मे रोजी जे. पी. नड्डा पत्रकार परिषदेत मोदी सरकारने आतापर्यंत केलेल्या विकासकामांबद्दल सांगणार आहेत. मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपने केंद्राच्या कामांची प्रसिद्धी करण्यासाठी एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. ज्याची सुरुवात ३१ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोठ्या रॅलीने होणार आहे. ३० मे ते ३० जून या कालावधीत चालणाऱ्या या विशेष मोहिमेत पक्षातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…