Saturday, June 29, 2024
Homeमहत्वाची बातमी...तर तेल आणि शस्त्रास्त्र करार रद्द करू

…तर तेल आणि शस्त्रास्त्र करार रद्द करू

रशियाची भारताला मोठी धमकी

मास्को : युक्रेनसोबतच्या युद्धामुळे जगापासून एकाकी पडलेला रशिया भारतावर (एफएटीएफ ) फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्समध्ये सहकार्य करण्यासाठी दबाव आणत आहे. तेथील स्थानिक वृत्तानुसार, जर भारताने रशियाला एफएटीएफच्या ‘ब्लॅक लिस्ट’ किंवा ‘ग्रे लिस्ट’मध्ये समाविष्ट होण्यापासून वाचवले नाही, तर ते भारतासोबतचे संरक्षण आणि ऊर्जा करार रशिया संपुष्टात आणेल. यामुळे भारताची चिंता देखील वाढली आहे.

एफएटीएफ ही एक आंतरराष्ट्रीय संस्था जी आर्थिक गुन्हे रोखण्याचा प्रयत्न करते. एफएटीएफच्या काळ्या किंवा ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या देशावर देखरेख वाढवली जाते आणि दिलेली आर्थिक मदत देखील थांबवली जाते. रशिया या परिस्थितीचा सामना करण्याची शक्यता आहे. त्यामुळे रशिया आता भारताकडे मदत मागत आहे. रशिया भारतासोबत अनेक देशांना एफएटीएफ यादीतून वाचवण्यासाठी दबाव आणत आहे. युक्रेनसोबतच्या युद्धामुळे एफएटीएफ जूनमध्ये रशियाचा ‘ब्लॅक लिस्ट’ किंवा ‘ग्रे लिस्ट’मध्ये समावेश करू शकते, अशी चर्चा आहे. यासाठी रशियाने भारताला संरक्षण आणि ऊर्जा करार संपवण्याची धमकी दिल्याचे सांगण्यात येते.

एफएटीएफ फेब्रुवारी २०२३ मध्ये रशियाची सदस्यता रद्द केली होती. रशियाची युक्रेनमध्ये सुरू असलेली लष्करी कारवाई एफएटीएफच्या मूलभूत तत्त्वांच्या विरुद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. एफएटीएफ रशियाचे सदस्यत्व रद्द केल्यापासून रशियाचा ब्लॅक लिस्ट किंवा ग्रे लिस्टमध्ये समावेश करण्याचा आग्रह धरत आहे. असे झाल्यास याचे ऊर्जा, संरक्षण आणि वाहतूक क्षेत्रावर अतिशय गंभीर परिणाम होतील, अशी धमकी रशियाने दिली आहे. एफएटीएफच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी रशियाने भारतावर दबाव आणला आहे. रशियालाही ग्रे लिस्टमध्ये टाकले तर ते भारतासाठी अडचणीचे कारण ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -