Friday, October 11, 2024
Homeताज्या घडामोडीएमटीएचएलचे उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते व्हावे

एमटीएचएलचे उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते व्हावे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इच्छा

मुंबई : समृद्धी महामार्गाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. असाच योगायोग मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या उद्धाटनासाठी व्हावा असे आम्हाला वाटत आहे, अशी इच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी व्यक्त केली. मुंबई पार बंदर प्रकल्पाची पहाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज केली. ते वेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, एमटीएचएल देशातला पाहिला मोठा सागरी मार्ग आहे. हा मार्ग नवी मुंबई, रायगड आणि मुंबई या तीन जिल्ह्यांना जोडणारा आहे. यामुळे १२ से १५ मिनिटात लोक या मार्गाने प्रवास करतील. आणि लोकांचा वेळ वाचेल असे मुख्यमंत्री म्हणाले.

हा मार्ग आर्थिक आणि प्रगतीचा महामार्ग आहे. पर्यावरण पूरक आहे. फडणवीसांच्या काळात मोदी जी यांच्या हस्ते समृद्धीचा शुभारंभ झाला आहे. असाच योगायोग या मार्गाचे लोकार्पण व्हावे असे आम्हाला वाटत आहे. या मार्गामुळे तिसरी मुंबई तयार होत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्याचे प्रगतीचे टार्गेट पूर्ण होण्यासाठी हा महत्त्वाचं प्रकल्प आहे. वेळ, इंधन, प्रदूषण वाचवणारा प्रकल्प आहे. मागच्या अडीच वर्षात स्पीड ब्रेकर लागला होता मात्र तो आम्ही हटवला आहे, असे ते म्हणाले. या मार्गाचा टोल सर्वसामान्यांना परवडणारा असेल असेही ते म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ट्रान्स हार्बर लिंक रोड मध्ये एक महत्वाचा टप्पा आज आपण गाठला आहे. नोव्हेंबर पर्यंत काम पूर्ण होऊन याचा लोकार्पण होईल अशी अशा बाळगतो आम्ही बाळगतो. पुढील वीस वर्षात आर्थिक चालना देण्याचे काम हा ब्रिज करेल. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे काही महिन्यात आपण या प्रकल्पासाठी परवानगी मिळवल्या. जेव्हा मुख्यमंत्री पंतप्रधान यांना लोकार्पण साठी आमंत्रित करतील तेव्हा या ब्रिज चे संशोधन करतील, असेही ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -