कराडपासून ऊस वाहतूकदारांच्या मोर्चाला सुरूवात

कराड : रयत क्रांती संघटनेच्या वतीने सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली काल २२ मे ला शेतकरी ऊस वाहतूकदारांचा मोर्चा कराडपासून सुरु झाला होता. आज मोर्चाचा दुसरा दिवस असून कराडजवळच्या बेलवडे हवेली येथे मुक्काम केल्यानंतर मोर्चा सातार्‍याच्या दिशेने निघाला आहे.


यावेळी सदाभाऊ खोत माध्यमांशी बोलताना म्हणाले, "ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, युवक यांच्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत कारण सरकार हे मायबाप सरकार असतं. आम्ही ज्या मागण्या घेऊन निघालो आहोत, त्यासाठी सरकारला स्वतःच्या तिजोरीतून काही खर्च करावा लागत नाही. परंतु शेतकरीविरोधी जे कायदे आहेत ते थोडे मागे घ्या. जे राज्य सरकारच्या हातात आहेत ते राज्य सरकारने मागे घ्यावेत व केंद्र सरकारच्या हातात असलेल्या कायद्यांना मागे घेण्यासाठी प्रस्ताव पाठवून द्यावा, अशा आमच्या साध्या व सोप्या मागण्या आहेत."


शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांसाठी सदाभाऊ खोत यांनी हा मोर्चा सुरु केला आहे. वाजतगाजत हा मोर्चा निघाला असून हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे.

Comments
Add Comment

Ganesh Naik : हत्तीसह वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई वाढविण्याचा विचार करा

- वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश मुंबई : हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

SIR : राज्यात अद्यापही १ कोटी ८० लाख ६० हजार मतदार 'एसआयआर'बाहेर

७७ टक्के मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण; शहरी भागात अनास्था, १७ ऑगस्टला संपणार मुदत मुंबई : देशभरात सुरू असलेल्या

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

Viksit Bharat Youth Conclave 2026 : पुण्यात रंगणार ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’; देशभरातील 1,000 युवकांचा सहभाग

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी