रु २००० च्या चलनी बँक नोटा – चलनामधून वापर थांबवण्यात येणार; लीगल टेंडर म्हणून सुरू राहतील…
प्रश्न १. २००० रुपयांच्या बँक नोटा चलनातून का बंद केल्या जात आहेत?
– २००० रुपयांच्या चलनी नोटा नोव्हेंबर २०१६ मध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या बँक नोटांचा लीगल टेंडर दर्जा काढून घेतल्यावर अर्थव्यवस्थेमधील चलनाच्या गरजेची पूर्तता वेगाने करण्यासाठी आरबीआय कायदा, १९३४ कलम २४ (१) अंतर्गत सुरू करण्यात आल्या होत्या. या उद्दिष्टाची पूर्तता झाल्यावर आणि इतर चलनी नोटांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता झाल्यानंतर २०१८-१९ मध्ये २००० रुपयांच्या बँक नोटांची छपाई थांबवण्यात आली. २००० रुपयांच्या बहुतेक नोटा मार्च २०१७ पूर्वी जारी करण्यात आल्या आणि त्यांच्या अंदाजे ४-५ वर्षांच्या आयुर्मानानुसार या नोटा आयुर्मान समाप्तीच्या
स्थितीत आहेत.
या चलनातील नोटा सर्वसामान्यपणे फारशा वापरल्या जात नसल्याचे दिसून आले आहे. तसेच इतर प्रकारच्या चलनी नोटा जनतेच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत आहेत. वरील सर्व बाबींचा विचार करता आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या “क्लीन नोट पॉलिसी”चा विचार करता २००० रुपयांच्या चलनी बँक नोटा व्यवहारातून बंद करण्याचा निर्णय घेण्यात
आला आहे.
प्रश्न २. क्लीन नोट पॉलिसी काय आहे?
– जनतेला चांगल्या दर्जाच्या बँक नोटांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आरबीआयने अंगीकृत केलेले हे धोरण आहे.
प्रश्न ३. २००० च्या बँक नोटांचा लीगल टेंडर दर्जा कायम राहणार आहे का?
– होय. २००० रुपयांच्या बँक नोटांचा लीगल टेंडर दर्जा पुढे सुरू राहील.
प्रश्न ४. २००० रुपयांच्या बँक नोटा सामान्य व्यवहारांसाठी वापरता येतील का?
– होय. सर्वसामान्य जनता २००० रुपयांच्या बँक नोटांचा त्यांच्या व्यवहारासाठी वापर करू शकते आणि त्यांना चुकती केलेली रक्कम म्हणून स्वीकारू शकते. मात्र, ३० सप्टेंबर २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी या नोटा बँकेत जमा करण्याची किंवा बदलून घेण्याची त्यांना सूचना करण्यात येत आहे.
प्रश्न ५. लोकांनी त्यांच्याकडे जमा असलेल्या २००० रुपयांच्या चलनी नोटांचे काय करावे?
– जनता त्यांच्याकडे असलेल्या २००० रुपयांच्या बँक नोटा त्यांच्या बँकेच्या शाखेत जमा करू शकते किंवा त्या बदलून घेऊ शकते. २००० रुपयांच्या बँक नोटा आपल्या खात्यात जमा करण्याची किंवा बदलून घेण्याची सुविधा सर्व बँकांमध्ये ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत उपलब्ध आहे. आरबीआयच्या इश्यू डिपार्टमेंट असलेल्या १९ प्रादेशिक कार्यालयांमध्ये (ROs) देखील नोटा बदलून घेण्याची सुविधा ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत उपलब्ध आहे.
प्रश्न ६. बँक खात्यांमध्ये २००० रुपयांच्या बँक नोटा जमा करण्यावर काही मर्यादा आहे का?
– बँक खात्यांमध्ये कोणत्याही मर्यादेविना नो युअर कस्टमर(केवायसी) निकषांनुसार आणि लागू असलेल्या इतर वैधानिक / नियामक गरजांनुसार नोटा जमा
करता येतील.
प्रश्न ७. २००० रुपयांच्या नोटा बदलून घेताना त्या रकमेवर परिचालनात्मक मर्यादा असेल का?
– जनतेला एका वेळी रु. २०,०००/- पर्यंत २००० रुपयांच्या बँक नोटा बदलून घेता येतील.
प्रश्न ८. २००० रुपयांच्या चलनी नोटा बिझनेस करस्पॉन्डन्ट (BC)कडून बदलून घेता येऊ
शकेल का?
– होय, खातेदारांना बिझनेस करस्पॉन्डन्टद्वारे दररोज ४,०००/- रुपये इतक्या मर्यादेपर्यंत २००० रुपयांच्या नोटा बदलून घेता येऊ शकतील.
प्रश्न ९. कोणत्या तारखेपासून नोटा बदलण्याची सुविधा उपलब्ध होईल?
– बँकांना पूर्वतयारी आणि आवश्यक व्यवस्था करण्यासाठी वेळ मिळावा या हेतूने, नागरिकांना विनंती आहे की, त्यांनी नोटा बदलण्याच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी २३ मे २०२३ पासून बँक शाखा किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रादेशिक कार्यालयांशी संपर्क साधावा.
प्रश्न १०. बँकांच्या शाखांमधून २००० रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी त्या बँकेचे खातेधारक असणे आवश्यक आहे का?
– नाही, एखाद्या बँकेचा खातेदार नसलेली व्यक्ती देखील कोणत्याही बँकेच्या शाखेतून २००० रुपयांच्या नोटा बदलून घेऊ शकते. एका वेळी केवळ २०,००० रुपयांपर्यंत नोटा बदलून घेऊ शकतात.
प्रश्न ११. एखाद्याला व्यवसाय किंवा काही इतर कारणांसाठी २०,००० रुपयांपेक्षा अधिक रकमेची आवश्यकता असेल तर काय करावे?
– बँकेच्या खात्यात नोटा कोणत्याही निर्बंधांशिवाय जमा करता येतील. २००० रुपयांच्या बँक नोटा बँक खात्यात जमा करता येतील आणि या ठेवींच्या बदल्यात रोख रक्कम काढता येईल.
अहमदाबाद, बंगलोर, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदिगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा आणि तिरुवनंतपुरम
प्रश्न १२. नोटा बदलून घेण्याच्या सुविधेसाठी काही शुल्क द्यावे लागेल का?
– नाही, नोटा बदलण्याची सुविधा निःशुल्क आहे.
प्रश्न १३. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती इत्यादींना नोटा बदलणे किंवा जमा करणे यासाठी काही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे का?
– २००० रुपयांच्या बँक नोटा बदलणे किंवा जमा करणे या प्रक्रियेत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती इत्यादींची गैरसोय कमी करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत.
प्रश्न १४. जर एखादी व्यक्ती २००० रुपये मूल्याच्या नोटा तातडीने जमा किंवा बदलू शकत नसेल,
तर काय होईल?
– ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि लोकांसाठी सोयीची व्हावी यासाठी २००० रुपयांच्या बँक नोटा बँकेत बदलणे किंवा जमा करणे या प्रक्रियेसाठी चार महिन्यांहून अधिक अवधी दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी, त्यांच्या सोयीनुसार दिलेल्या वेळेत या सुविधेचा लाभ घ्यावा.
प्रश्न १५. २००० रुपयांच्या बँक नोटा बदलायला किंवा बँकेत जमा करून घ्यायला बँकांनी नकार दिला,
तर काय करायचे?
– बँकेच्या सेवेत त्रुटी आढळल्यास तक्रारीचे निवारण करण्यासाठी, तक्रारदार/पीडित ग्राहक प्रथम संबंधित बँकेशी संपर्क साधू शकतात. जर बँकेने तक्रार दाखल झाल्यानंतर ३० दिवसांच्या कालावधीच्या आत प्रतिसाद दिला नाही किंवा बँकेचा प्रतिसाद किंवा उत्तरामुळे ग्राहक संतुष्ट नसेल तर तक्रारदार, भारतीय रिझर्व्ह बँकेकडे एकात्मिक लोकपाल योजना (RB-IOS), २०२१ अंतर्गत आर बी आयच्या तक्रार व्यवस्थापन प्रणाली पोर्टलवर (cms.rbi.org.in) तक्रार नोंदवू शकतो.
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…