नांदेड : नांदेडमधील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान एका अठरा वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. मुलीच्या नातेवाईकांनी डॉक्टरांनी दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे हा मृत्यू ओढवला, असा आरोप केला आहे. जोपर्यंत संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. मुलीच्या मृत्यूला ३ दिवस उलटले तरीही नातेवाईकांनी या कारणास्तव मृतदेह ताब्यात घेतलेला नाही.
मृत तरुणी अठरा वर्षीय विद्यार्थिनी होती. १८ मे ला तिला चक्कर आल्यामुळे शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान काही वेळातच तिचा मृत्यू झाला.
दरम्यान गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईक आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी जिल्हाधिका-यांकडे दाद मागितली. “नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार संबंधित डॉक्टर व स्टाफकडून जो निष्काळजीपणा झाला असेल त्यावर समिती स्थापन करुन कोणी दोषी आढळल्यास त्यावर निश्चित योग्य ती कारवाई केली जाईल”, असं जिल्हाधिकारी म्हणाले.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…