गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून आयटी इंजिनीअर दाम्पत्याचा नवा उपक्रम

नांदेड : पोटापाण्यासाठी अनेक तरुण मुंबई-पुण्यासारख्या शहरात आठ ते बारा तासांची नोकरी करताना आपल्याला दिसतात. पण काम पोटासाठीचं असलं तरी ते आवडीचं असावं लागतं अन्यथा त्याचा कामावर परिणाम होतो. म्हणूनच की काय आपली आवड जपत एका आयटी इंजिनीअर दाम्पत्याने गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून शेवग्याच्या पाल्यापासून नवीन आणि वेगळा उपक्रम सुरु केला आहे. यातून मिळणारं उत्पन्न आयटी पगाराच्या बरोबरीचं नसलं तरी मिळणारं आत्मिक समाधान पराकोटीचं आहे. मंजुषा पावडे आणि गुलाब पावडे असं या शेतकरी दाम्पत्याचं नाव आहे.

मूळ नांदेड येथील पावडेवाडीचे ते रहिवासी आहेत. पुणे-मुंबईसारख्या मेट्रो शहरात आयटी इंजिनीअर असलेल्या या दाम्पत्याने १५ वर्षे नोकरी केली. महिन्याकाठी दोघांना मिळून जवळपास तीन ते साडेतीन लाख रुपये पगार मिळत होता. परंतु शेतीच्या माध्यमातून वेगळा व्यवसाय सुरु करण्याच्या त्यांच्या स्वप्नामुळे त्यांना पैशाची भुरळ पडली नाही.

यासाठी त्यांनी हैदराबाद येथे वास्तव्यास असताना शेतीविषयक माहिती मिळवण्यास सुरुवात केली. त्यांनी शेवग्याच्या शेंगांची लागवड करायचे ठरवले. शेवग्याचे औषधी गुणधर्म, फायदे या सगळ्याची माहिती घेऊन ते आपल्या गावी परतले. तिथे त्यांनी शेवग्याची शेती सुरु केली मात्र त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून या दाम्पत्याने या शेतीतूनच संशोधनकार्य सुरु केले आणि त्यातून मोरिंग्या पावडरची निर्मिती केली.

ही पावडर मधुमेहासाठी अत्यंत गुणकारी असल्याचं त्यांनी सांगितलं. ही पावडर ते प्रतिकिलो एक हजार रुपये या दराने विकतात. डॉक्टर आणि अनेक व्यावसायिकांकडून या पावडरला प्रचंड मागणी आहे. पावडे जोडपं यातून महिन्याकाठी जवळपास दीड लाख रुपये कमावतं. कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळून देणारा हा व्यवसाय मंजुषा पावडे आणि गुलाब पावडे हे यशस्वीरित्या सांभाळत आहेत.

पावडर तयार करण्याची प्रक्रिया

शेवग्याच्या रोपांची लागवड केल्यानंतर तीन महिन्यानंतर पाला उपलब्ध होतो. त्यानंतर पाला तोडून, तो एकत्र करुन भिजत घालतात. निर्जंतुकीकरण करण्यासाठी लिंबाची पानं आणि मीठ देखील योग्य प्रमाणात टाकलं जातं. त्यानंतर दोन ते तीन दिवस पाला सुकण्यासाठी ठेवला जातो. पाला पूर्ण सुकल्यानंतर मशीनमधून बारीक करुन पावडर तयार केली जाते. त्यानंतर पाव किलो, अर्धा किलो आणि एक किलोप्रमाणे पॅकिंग करुन ऑर्डरप्रमाणे विक्री केली जाते.
Comments
Add Comment

नागपुर पोलिसांची ‘ऑपरेशन शक्ती' अंतर्गत मोठी कारवाई, OYO मध्ये चालला होता भलताच प्रकार

ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक, एक फरार नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण मुंबई : श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत होणार मुंबई:  स्थानिक स्वराज्य संस्था

आई म्हणाली अभ्यास कर, मुलीने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अगदी लहान कारणामुळे एका १८ वर्षीय

Beed Crime Govind Barge Death : प्रेम, पैसा आणि लॉज कनेक्शन…गोविंद बर्गेप्रकरणात नर्तकी पूजाचा नवा ट्विस्ट समोर

बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या मृत्यू

विदर्भातील स्पेशल ‘कच्चा चिवड्या’चा विश्वविक्रम

नागपूर : कच्चा चिवडा हा शब्द कानावर पडला तरी तोंडाला पाणी सुटते. कच्चा चिवडा ही विदर्भामधील एक झटपट बनणारी