पुढची ५ वर्षे भयानक उकाड्याची...

न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) : येणाऱ्या पाच वर्षांत लोकांना सर्वाधिक तापमानाचा सामना करावा लागू शकतो. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान विभागाने याबाबतचा इशारा दिला आहे. आगामी ५ वर्षे भयानक उकाड्याची असतील व उष्णतेचे पूर्वीचे सर्व रेकॉर्ड्सही मोडीत निघणार आहेत.



२०२३ ते २०२७ या काळात कमाल उष्णता कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे. या पाच वर्षांत एक असे वर्षही, असेल जे २०१६च्या तापमानाचा विक्रम मोडणारे वर्ष ठरेल, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. युनायटेड नेशन्सच्या जागतिक हवामान संघटनेने म्हटले आहे की, जागतिक तापमान लवकरच पॅरिस हवामान करारामध्ये निश्चित केलेल्या तापमानाची मर्यादा ओलांडण्याची शक्यता आहे. डब्ल्यूएमओच्या म्हणण्यानुसार, पुढील पाच वर्षांमध्ये विक्रमी उष्णता वाढण्याची ९८ टक्के शक्यता आहे. ग्रीनहाऊस गॅस आणि एल निनोमुळे वाढत्या तापमानाचा इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे. हवामान बदलाच्या वेगामुळे तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.


एल-निनोबाबत इशारा




  • नासाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा प्रशांत महासागरातील उबदार पाण्याची लाट दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यापासून पूर्वेकडे आली होती, त्यामुळेच मे महिन्यात आधी थंडी पडली आणि नंतर अचानक उष्णता वाढली. या लाटा एल-निनोच्या आधीच्या लाटा म्हणूनही
    ओळखल्या जातात.

  • नासाने जारी केलेल्या नकाशात लाल आणि पांढऱ्या रंगाचे समुद्राचे क्षेत्र दिसत आहे, तिथे गरम पाणी वाहत आहे. या गरम पाण्यामुळे देशाच्या विविध भागात भयंकर उष्मा आणि पावसाळा येणार आहे.

  • जोश विलिस यांच्या मते यावेळी एल-निनो आणि सुपरचार्ज केलेले समुद्राचे तापमान एकत्र येत आहे. त्यामुळे पुढील १२ महिने अनेक प्रकारचे रेकॉर्ड मोडले जाऊ शकतात. यातील बहुतांश तापमान कमाल तापमानाशी संबंधित असेल.

Comments
Add Comment

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व