'एक रंग एक गणवेश' बाबतचा निर्णय अजूनही प्रतिक्षेत

शाळा सुरू होण्यास केवळ एक महिना शिल्लक


मुंबई : यंदा शासनाकडून राज्यातील सर्व सरकारी व अनुदानित शाळांसाठी 'एक रंग एक गणवेश' धोरण आखण्याचा विचार सुरू आहे. १५ जून रोजी शाळा सुरु होतील. मात्र शाळा सुरू होण्यास एक महिना शिल्लक असताना शासनाकडून गणवेशाच्या रंगाबद्दल निर्णय झालेला नाही. कोणत्या रंगाच्या गणवेशाची ऑर्डर द्यायची असा प्रश्न शाळांना पडला आहे.


शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शाळा व्यवस्थापन आणि अधिकाऱ्यांसोबत ११ मे रोजी घेतलेल्या बैठकीत गणवेशाबाबतचा निर्णय पुढील एक ते दोन दिवसांत घेतला जाईल, असे माध्यमांशी बोलताना म्हटले होते. मात्र आठवडाभरानंतरही हा निर्णय न आल्याने कोणत्या गणवेशाची ऑर्डर द्यायची, याबाबत शाळा संभ्रमात आहेत.


शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी मे महिन्यात जिल्हास्तरावर गणवेशासाठी निधी मिळतो आणि विद्यार्थी संख्येनुसार तो शाळांना दिला जातो. त्यानंतर शाळा व्यवस्थापन कापड खरेदी करून विद्यार्थ्यांच्या कपड्यांचे माप घेऊन गणवेश शिवून घेण्याची ऑर्डर देते. परंतु निर्णयाच्या स्थगितीमुळे यासंदर्भात शिक्षण विभागाने स्पष्टता आणावी अशी मागणी शाळा व्यवस्थापनाने केली आहे.

Comments
Add Comment

देशामध्ये २२ बनावट विद्यापीठे

‘यूजीसी’ने जाहीर केली यादी मुंबई  : मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता