बेस्टच्या डेपोजमध्ये सीएनजी भरण्याची विशेष सुविधा

मुंबई (प्रतिनिधी) : भारतातील प्रमुख शहरी गॅस वितरण कंपनी महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) यांनी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्स्पोर्ट (बीइएसटी) यांच्या सहयोगाने घाटकोपर बेस्ट बस डेपो येथे ‘एमजीएल तेज’ची सुरूवात केली. या उपक्रमाअंतर्गत ’एमजीएल तेज’च्या वापरकर्त्यांसाठी विशेष सीएनजी डिस्पेन्सरचे उद्घाटन बीइएसटीचे जनरल मॅनेजर लोकेश चंद्रा आणि एमजीएलचे बोर्ड डायरेक्टर सय्यद शहानवाझ हुसेन यांच्या हस्ते करण्यात आले. एमजीएल डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर संजय शेंडे आणि महानगर गॅस लिमिटेड आणि बीइएसटीमधील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.



या नव्यानेच सुरू केल्या गेलेल्या मोबाइल अॅप्लिकेशनमध्ये चारचाकी सीएनजी वाहनांच्या वापरकर्त्यांना बीइएसटी बस डेपोमधील सीएनजी सुविधेमध्ये रिफ्युएलिंगसाठी विशिष्ट वेळा (टाइम स्लॉट) आरक्षित करता येतील.



‘एमजीएल तेज’ अॅप गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून त्याचा उपयोग करून सीएनजी वाहनधारक त्यांच्या सोयीनुसार आधीपासूनच विशिष्ट वेळ (टाइम स्लॉट) आरक्षित करून लांब रांगेत थांबणे कमी करू शकतील. या डेपोमध्ये ‘एमजीएल तेज’ द्वारे बुकिंग केलेल्या ग्राहकांसाठी एक विशिष्ट सीएनजी डिस्पेन्सर असेल. वापरकर्ते (ग्राहक) सकाळी ९.०० ते संध्याकाळी ७.०० या काळात, आठवड्यातील सर्व दिवशी, सीएनजी भरण्यासाठी विशिष्ट वेळ आरक्षित करू शकतील व डिजिटल माध्यमांद्वारे पैसे भरू शकतील.



सध्या, ही सेवा गोरेगाव-ओशीवारा आणि घाटकोपर बस डेपोंमध्ये उपलब्ध आहे आणि अशाच प्रकारची सुविधा मुंबई मधील बीइएसटी व्यवस्थापनाखालील इतर १३ बस डेपोंमध्ये देण्याचे नियोजित आहे.

Comments
Add Comment

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा