रत्नागिरी जिल्ह्यात बायोमेट्रिक हजेरीचा फज्जा

रत्नागिरी (प्रतिनिधी) : सरकारी कर्मचाऱ्यांकडून कामावर केव्हाही या... केव्हाही जा... अशी स्थिती रत्नागिरीत सुरू आहे. विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी देत नाहीत, तर ते ऑफलाइन पद्धतीने हजेरी लावून आपला पगार काढत आहेत. दर महिन्याला हजारो कोटी रुपये शासन यांच्या मानधनावरती खर्च करते; परंतु अधिकारी मात्र वेळेवर उपस्थित नसतात. तसेच अधिकारी रजेच्या अर्जाचेही मोठे गौडबंगाल निर्माण झाले आहे. बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी नसल्याने ऑफलाइन गैरहजर असण्याचा दिलेला अर्ज कालांतराने रद्द केला जात आहे.



शासकीय कार्यालयात कधीही जा, साहेब रजेवर आहेत... साहेब व्हीजिटवरती आहेत... या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी न होता ऑफलाइन पद्धतीने हजेरी होते. अशा अधिकाऱ्यांची हजेरी न घेता मुख्यमंत्र्यांनी हजेरी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पालकमंत्र्यांकडून मिळणारी सूट यामुळे अनेक अधिकारी कर्मचारी सुस्तावल्याचे चित्र पहायला मिळत आहे. विशिष्ट कार्यालयांचे अनेक कर्मचारी शासकीय वेळेत कार्यालयात उपस्थित नसतात. तसेच शासकीय कार्यालयामध्ये सकाळी येण्याची आणि दुपारच्या जेवणाची तसेच संध्याकाळी ऑफिस सुटण्याची वेळ दिलेली नसल्याचा फायदा अनेकजण घेत आहेत. रत्नागिरी शहरातील आणि परिसरातील असणाऱ्या विविध शासकीय कार्यालयातील बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेतली जात नसल्याचा फायदा अनेकांना होत आहे. तसेच बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी नसल्याने रजेवर असणाऱ्या अधिकाऱ्यांची चांगलेच फावत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून रजेचा टाकलेला अर्ज दिवसभरात वरिष्ठांनी न विचारल्यास तो रद्द करुन ऑफलाइन पद्धतीने मस्टवरती सह्या केल्या जातात. अशा व्यक्तींवरती कोणत्याही प्रकारे कारवाई होताना दिसत नाही.



रत्नागिरीतील अडीचशे ते तीनशे कार्यालयात हा सावळा गोंधळ सुरू असून याकडे मुख्यमंत्र्यांनी कठोर निर्देश देताना बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी आणि पगार अस्तित्वात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी आयस्कॅनर लावणे गरजेचे आहे. आयस्कॅनरच्या माध्यमातून हजेरी घेतल्यास त्यामध्ये कोणत्याही प्रकारची खाडाखोड किंवा गैरप्रकार येत नाही. अनेक कंपन्यांमधून याचा वापर केला जातो; परंतु शासकीय कार्यालयातून मात्र त्याला खो घातला जात आहे.



रजिस्टरवरही अनेक कर्मचारी नोंदच करत नाहीत. दुपारी जेवायला घरी गेलेला कर्मचारी अधिकारी झोपा काढून चहा पिण्याच्या वेळेवर ऑफिसमध्ये येतो हे थांबण्यासाठी आय स्कॅनर बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात होणे गजरेचे आहे. त्यामुळे कामात टंगळमंगळ करणारे आणि रजेचा अर्ज देऊन नंतर पुन्हा हजेरी हजर असल्याचे दाखवणाऱ्यांवर अंकुश येण्यास मदत होईल.

Comments
Add Comment

Mumbai Seaplane : मुंबई-रत्नागिरी सी-प्लेन सेवेला वेग; कोकण पर्यटनासाठी मोठे पाऊल

मुंबई : कोकणातील पर्यटनाला नवी चालना देण्यासाठी मुंबई (Mumbai) आणि रत्नागिरीदरम्यान (Ratnagiri) सी-प्लेन सेवा सुरू

Matsya Sampada Yojana : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ अधिकाधिक मच्छिमारांपर्यंत पोहोचवा; नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची (Matsya Sampada Yojana) प्रभावी अंमलबजावणी करून राज्यातील अधिकाधिक मच्छिमारांना

Vadkhal Bypass : वडखळ बायपासची दुरवस्था; अपूर्ण कामातच टोलवसुलीमुळे वाहनचालक संतप्त

रायगड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ बायपासची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, पावसाळ्यात हा

Matheran's Honeymoon Point : माथेरानच्या हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन; सीसीटीव्हीत थरारक दृश्य कैद

रायगड : माथेरानच्या प्रसिद्ध हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण

Kokan Railway : प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद; 16 जुलैपासून इंटरसिटी, डेक्कन क्वीन पुन्हा रुळावर

रायगड : मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये वाढलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेता अतिरिक्त गाड्या

Dapoli Mahabaleshwar highway : दापोली–पोलादपूर–महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गासाठी प्रवीण दरेकरांची गडकरींकडे मागणी

मुंबई : दापोली–पोलादपूरमार्गे महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी देण्याची मागणी भाजपचे गटनेते तथा आमदार