मुंबई : सध्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटवरुन अनेक ठिकाणी वादही सुरु आहे. ‘द केरला स्टोरी’ रिलीज होण्यापूर्वीच त्याचा विरोध सुरु झाला होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर राजकारण अधिकच तापले आहे. पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या मंत्र्यांसोबत बसून हा चित्रपट पाहिला. ‘द केरला स्टोरी’ च्या मुद्द्यावरुन सर्वसामान्य प्रेक्षकही दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत. टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने तिचा पती शाहनवाज शेखसोबत ‘द केरला स्टोरी’ पाहिला. इतकंच नव्हे तर अभिनेत्रीने याबाबत आपले मत मांडले आहे.
‘साथ निभाना साथिया’ मालिकेतून गोपी बहूच्या रुपात घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे देवोलिना भट्टाचार्जी होय. देवोलिना सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे चर्चेत असते. देवोलिना भट्टाचार्जीने काही काळापूर्वी शाहनवाज शेख या आपल्या मुस्लिम बॉयफ्रेंडसोबत लग्न केले आहे.
एका ट्विटला उत्तर देत आणि पतीची बाजू मांडत तिने म्हटले आहे, ‘हे नेहमीच होत नाही. माझे पती मुस्लिम आहेत आणि ते माझ्यासोबत चित्रपट पाहायला गेले होते. या चित्रपटाचे त्यांनी कौतुक केले. या गोष्टीमुळे तो दुखावला गेला नाही किंवा हा चित्रपट आपल्या धर्माविरुद्ध आहे असे त्याला अजिबात वाटले नाही. माझ्या मते प्रत्येक भारतीय असाच असावा.
देवोलीनाने हे ट्विट इन्कॉग्निटो नावाच्या युजरने पोस्ट केलेल्या दुसर्या ट्विटला उत्तर देताना लिहिले आहे, यामध्ये असे लिहिले आहे की, ‘माझ्या सहकलाकाराची मैत्रीण निधीचे दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. तिने तिच्या प्रियकराला ‘द केरला स्टोरी’ बघायला सांगितले. त्याने केवळ चित्रपट पाहण्यास नकार दिला नाही तर तिला शिवीगाळही केली आणि प्रेयसीला इस्लामोफोबिक म्हटले. ती घाबरली आणि तिने तिच्या प्रियकराला विचारले की, तो इतका वाईट का वागत आहे. ती मुस्लीमाला डेट करत असताना ती मुस्लिमविरोधी कशी असू शकते’.
ट्विटमध्ये पुढे लिहिण्यात आले आहे की, ‘तिच्या बॉयफ्रेंडने तिला म्हटले की, जर ती मुस्लिमविरोधी नसेल तर तिने मुस्लिम बनून त्याच्याशी लग्न करावे. तिने होकार दिला, पण तरीही तिला चित्रपट बघायचा होता म्हणून ती एका मैत्रिणीसोबत गेली. चित्रपट पाहून ती परत आली तेव्हा तिने प्रियकराला बोलावून ब्रेकअप केले. ‘द केरला स्टोरी’चा समाजावर असा परिणाम होत आहे. त्यामुळे ते या चित्रपटावर बंदी घालू इच्छित आहेत. असे त्या ट्विटमध्ये सांगण्यात आले होते. देवोलीनाचे हे ट्विट द्वेष आणि भीती पसरवणाऱ्यांना योग्य उत्तर आहे, असे चाहत्यांचे म्हणणे आहे.
देवोलिना सध्या ३७ वर्षांची आहे. फारच कमी वयात तिने छोट्या पडद्यावर प्रचंड नाव कमावले आहे. देवोलिना टीव्ही शो ‘साथ निभाना साथिया’मध्ये गोपी बहूच्या भूमिकेतून लोकप्रिय झाली होती. तिने गेल्या वर्षी १४ डिसेंबर २०२२ रोजी तिचा बॉयफ्रेंड शाहनवाज शेखसोबत गुपचूप लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला अवघे ५ महिने झाले आहेत. देवोलीनाचा पती व्यवसायाने उद्योजक आहे. तो इंटरनेट आणि केबलशी संबंधित व्यवसाय पाहतो. तो फिटनेस ट्रेनर म्हणूनही प्रसिद्ध आहे. देवोलिना सतत आपल्या सोशल मीडियावर पतीसोबतचे सुंदर व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते.
डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…
रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…
नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…