रत्नागिरी-सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटाची वाट बिकटच!

खेड : सह्याद्रीच्या कुशीत सुमारे ४ हजार फूट उंचीवर वसलेल्या अन् तितक्याच नागमोडी वळणाचा असलेल्या सह्याद्रीच्या कडेकपारीतून थेट पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात जाणाऱ्या रघुवीर घाटाची अवस्था बिकटच असून घाटाचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी शासनाच्या निधीची ‘प्रतीक्षा’च आहे. मात्र याचवेळी गेल्या पावसाळ्यात कोसळलेल्या नैसर्गिक दरडी घाटात आजही कायम आहेत.



दरडीचा घाट म्हणून गेल्या काही वर्षांत या घाटाने आपली ओळख निर्माण केली आहे, ती याच कारणामुळे. मानवी मेंदूने सह्याद्रीच्या पर्वत रांगा मागे हटवत त्यातून निर्मित केलेला रस्ता ही एक अशक्यप्राय बाबच असल्याचे बोलले जात आहे. कोरीव सह्याद्रीचे कातळ फोडून त्यातून २ जिल्ह्यांच्या सीमा एकत्र जोडण्याचा प्रशासनाने केलेला भरीव प्रयत्न उल्लेखनीयच आहे. परंतु या घाटाच्या निर्मितीनंतर घाटामध्ये पावसाळी कालावधीत निर्माण होणारी नैसर्गिक आपत्ती ही या घाटाचे मुख्य दुखणे आहे.



खेड तालुक्यापासून सुमारे २२ किमी अंतरावर असलेल्या रघुवीर घाटाला पावसाळ्यामध्ये पर्यटकांची चांगलीच पसंती लाभते. सुमारे ३ महिने पावसाची विविध रूपे या घाटात पर्यटकांची मने मोहून टाकणारीच असतात. त्यामुळे या घाटात पर्यटकांची जणू काही मांदीयाळीच पाहावयास मिळते. रघुवीर घाट १० किमी अंतराचा असून या मार्गावर ७ ठिकाणे धोक्याची तसेच दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने हा घाट सध्या तरी पावसाळा कालावधीत डेंजर झोनमध्येच आहे. या ठिकाणी पावसाचे प्रमाणदेखील मोठ्या प्रमाणात असल्याने नैसर्गिक आपत्तीचा सामना दरवर्षी या घाटाला करावा लागतो.


खोपी-शिरगावच्या डोंगर माथ्यावरील हा घाट पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा आहे. त्यामुळे भौगोलिक दुवा असलेल्या या घाटातील अनेक समस्या आजही ‘जैसे थे’च आहे. रस्ते उखडलेल्या अवस्थेत असून रेलिंगची देखील मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. घाटाला नवनिर्मितीकरिता शासनाने सढळ हाताने निधी देऊन त्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे होते. परंतु तसा कोणताही प्रस्ताव शासन दरबारी गेलाच नसल्याने हा घाट सेवासुविधांअभावी कोसो दूरच आहे. वळणा-वळणाचा रस्ता, दृष्टी पथात येणारा निसर्ग यामुळेच या घाटाच्या वैशिष्ट्यांनी हा घाट पर्यटनाच्या पटलावर आला.

Comments
Add Comment

Coronation of Shivaji Maharaj : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे'

रायगड : दुर्गराज रायगडावर तिथीनुसार २७ जून २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला

Mantri Nitesh Rane : कोकणातील तीर्थस्थळे जलमार्गांनी जोडणार!

मंत्री नितेश राणे यांची संकल्पना; आंगणेवाडी, कुणकेश्वर, गणपतीपुळे, पाली बल्लाळेश्वर मंदिराचा समावेश मुंबई :

Narendra Modi : सिंधुदुर्ग आणि नाशिक जागतिक पर्यटन स्थळे म्हणून विकसित करणार!

नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडला रोडमॅप; २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार