गुजरातच्या किनारपट्टीवर जप्त केला तब्बल १२ हजार कोटींचा ड्रग्ज साठा

  236

अहमदाबाद : गुजरातच्या किनारपट्टीवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि नौदलाच्या संयुक्त कारवाईत इराणहून गुजरातला आणला जाणारा २६०० किलो ड्रग्जचा साठा पकडला आहे. भारतीय समुद्रकिनाऱ्यावर काही माफिया मोठ्या प्रमाणावर ड्रग्जची तस्करी करणार असल्याची गुप्त सूचना नौदलाच्या गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. या ड्रग्जची किंमत तब्बल १२ हजार कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.


इराणहून गुजरातला आणले जाणारे हे अमली पदार्थ तिथे पोहोचण्यापूर्वीच नौदलाच्या गुप्तचर यंत्रणेमुळे ताब्यात घेण्यात यश आले आहे. नौदलाच्या आयएनएस टीईजी F-14 या जहाजाने अरबी समुद्र परिसरात ही अमली पदार्थाची खेप पकडली आहे. सुदानमध्ये भारतीयांच्या सुटकेसाठी आयएनएस टीईजी तैनात करण्यात आली होती. तिथून परतताच ही मोठी कारवाई झाली आहे.


तस्करी करणा-या जहाजावर असलेल्या माफियाला कोची बंदरावर नेऊन त्याची चौकशी नौदल आणि एनसीबी करत आहेत. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्यांविषयी तसंच ड्रग्जच्या तस्करीविषयी सविस्तर चौकशी केली जाणार आहे. सागरी मार्गाने भारतात आणली जाणारी ड्रग्जची आतापर्यंत ही सर्वात मोठी खेप आहे.


याआधीही फेब्रुवारी २०२२ मध्ये भारतीय नौदलाच्या नेव्हल इंटेलिजन्स युनिटने २००० कोटींच्या ड्रग्जची खेप पकडली होती. गुजरातच्या लगतच्या सागरी भागात अनेकवेळा कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.


Comments
Add Comment

व्लादिमीर पुतिन डिसेंबरमध्ये भारतात दौऱ्यावर येणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत करणार द्विपक्षीय चर्चा नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आगामी

हिमाचल प्रदेश : चंबा येथे दरड कोसळून ११ जणांचा मृत्यू

शिमला : हिमाचल प्रदेशातील चंबा आणि भरमौर परिसरात जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. भरमौर परिसर

बिहारच्या ३ लाख मतदारांना निवडणूक आयोगाची नोटीस

परदेशी नागरिक असल्याच्या संशयावरून बाजवली नोटीस पाटणा : बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण

पंतप्रधान मोदींना जपानमध्ये खास भेट म्हणून मिळाली दारुम बाहुली

टोकियो / नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शुक्रवारी (दि.२९)

Bihar Election : मोदींवर अपशब्दांचा वर्षाव अन् शाहांचा इशारा..."जितक्या शिव्या द्याल, तितकं कमळ बहरणार!"

बिहार : बिहारमध्ये या वर्षाअखेर होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार सुरू केली आहे.

उत्तराखंडमध्ये ढगफुटी आणि मुसळधार पावसाचा कहर

डेहराडून : उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा पावसाने रौद्र रूप धारण केले आहे. टिहरी जिल्ह्यातील गेंवाली भिलंगना येथे