परळ टीटी पूल २० मे पर्यंत बंद

  137

मुंबई : दादरजवळील बाबासाहेब आंबेडकर रोडवरील परळ टीटी पूल बुधवारी, १० मे रोजी काही प्रस्तावित दुरुस्तीच्या कामाकरता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. लोकांना कोणताही धोका किंवा अडथळा होऊ नये म्हणून हा पूल आता आणखी आठ दिवस म्हणजे २० मे पर्यंत बंद राहील.


"दुरुस्तीच्या कामादरम्यान वाहतूक सुरळीत राहावी यासाठी परळ टीटी पुलावरील सर्व प्रकारच्या वाहनांसाठी रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पुलाकडे जाणारा रस्ता बंद केला जाईल", असे डीसीपी (दक्षिण) गौरव सिंह यांनी सांगितले.


“परळ टीटी उड्डाणपुलाच्या प्रस्तावित दुरुस्तीच्या कामाच्या दृष्टीने आणि वाहतूक सुरळीत होण्यासाठी तसंच लोकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियम १० मे पासून लागू केले जातील,” असं वाहतूक पोलिसांच्या अधिसूचनेत म्हटले आहे.


उत्तरेकडील डॉ बीए रोडवरून दादर टीटीकडे जाणार्‍या वाहतुकीसाठी परळ टीटी पुलाचा स्लिप रोड आणि हिंदमाता पुलाचा स्लिप रोड हा पर्यायी मार्ग आहे. त्याचप्रमाणे दक्षिणेकडील डॉ. बी.ए. रोडवरून भायखळ्याकडे जाणार्‍या वाहतुकीसाठी हाच पर्यायी मार्ग आहे.

Comments
Add Comment

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई

शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून पसायदानाचे पठण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) :