सगळ्यामध्ये तोंड घुसवायची संजय राऊतांची सवय : नितेश राणे

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन काही मते मांडली. संजय राऊतांना सगळ्यामध्ये तोंड खुपसायची सवय आहे,असा दावा त्यांनी यावेळी केला. तसंच देशात लोकशाहीच्या अस्तित्वाविषयी प्रश्न उपस्थित करणार्‍या संजय राऊतांना त्यांच्याच पक्षप्रमुखांच्या गैरवर्तुणुकीची उदाहरणे देऊन चपराक दिली.


"संजय राऊत सातत्याने कायद्याचा गाढा अभ्यास असणार्‍या राहुल नार्वेकरांवर टीका करतात, जणू काही हे स्वतःच फार मोठे घटनातज्ज्ञ किंवा मुन्नाभाई एल.एल.बी आहेत. पण त्यांनी एक लक्षात घ्यावं की ज्या राहुल नार्वेकरांवर तुम्ही टीका करतायत त्यांच्याकडेच तुमच्या मालकाचा मुलगा म्हणजे आदित्य ठाकरे कायदा शिकायला जात होते. म्हणजेच आदित्य ठाकरेलाहु कायद्याचं काही कळत नाही", असं नितेश राणे म्हणाले.


आजच्या निकालावरुन देशात लोकशाही आहे की नाही हे कळेल, असं टेपरेकाॅर्डर संजय राऊत यांनी लावलं आहे. म्हणजे यांच्याविरुद्ध लागला तस लगेच लोकशाही खतरे में है, असं हे म्हणतील. पण ज्या देशात तुम्ही लोकशाहीचा सवाल उपस्थित करताय तिथे लोकशाही नसती तर आदित्य ठाकरे कोविडच्या वेळी जग घरात बसलेलं तेव्हा हाॅटेलमध्ये दारु पित बसले नसते. कर्नाटकात प्रचार करणार्‍या माननीय पंतप्रधान मोदींनी देश सांभाळला पाहिजे, हे राऊतांनी उद्धव ठाकरेंना ते मुख्यमंत्री असताना समजवायला पाहिजे होतं. तसंच गोवा विधानसभा निवडणुकीच्या वेळी आदित्य शिवसेनेच्या प्रचारासाठी गेले असताना डब्ल्यू हाॅटेलच्या रुममध्ये काय करत होते?" असं म्हणत नितेश राणेंनी राऊतांची चांगलीच जिरवली आहे.


सामनाच्या अग्रलेखामधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल बोलण्याची तुमची लायकी नसल्याचं नितेश राणे संजय राऊतांना म्हणाले. 'कोर्टाचा आजचा निकाल हा संविधानानुसारच होईल, उगाच संजय राऊतांनी दुसर्‍यांना धडे देऊ नये' असा सल्लाही नितेश राणे यांनी दिला.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार, मीरा भाईंदर ते वसई-विरार मेट्रो मार्ग १३ आणि पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणास मंजुरी

मुंबई : मुंबई महानगरप्रदेशातील वाहतुकीला चालना देण्यासाठी मेट्रो १३ -मिरा भाईंदर ते वसई विरार या प्रकल्पास तसेच

BHMS Doctors : बीएचएमएस डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमधील नोंदणी बंद, न्यायालयाचा निकाल येईपर्यंत स्थगिती; वैद्यकीय शिक्षण विभागाचा निर्णय

मुंबई : राज्यातील बीएचएमएस डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमधील नोंदणीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

ED Raid : ₹10 हजार कोटींच्या कथित पॉन्झी घोटाळ्याने खळबळ; ED ची मोठी कारवाई! मुंबई-भोपाळमध्ये छापे, ₹30 कोटींची मालमत्ता गोठवली

Mumbai : मुंबई आणि भोपाळमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ED) केलेल्या मोठ्या कारवाईमुळे कथित 10 हजार कोटी रुपयांच्या सागा

Chandrakant Patil : विधानमंडळ सदस्यांच्या स्वीय सहाय्यक आणि वाहनचालकांच्या मानधनात वाढ; संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाच्या विद्यमान सदस्यांच्या स्वीय सहाय्यक आणि वाहनचालकांच्या मानधनात वाढ करण्याचा

Mumbai Update : मुंबईत मलेरियाचा वाढता धोका; 3,177 रुग्णांची नोंद, डेंग्यू-लेप्टोमध्ये मात्र घट

Mumbai : मुंबईत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने उपाययोजना तीव्र

Mumbai Navy Nagar News : नौदल जवान, पत्नी अन् दोन चिमुकल्यांचा संशयास्पद मृत्यू; मुंबईतील 'नेव्ही नगर'मध्ये धक्कादायक घटना

राजस्थान : राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील ककराना गावातील रहिवासी आणि भारतीय नौदलात कार्यरत असलेले जवान