चेन्नई (वृत्तसंस्था) : आयपीएलचा यंदाचा हंगाम चांगलाच रंगात आला असून प्ले ऑफ प्रवेशाच्या दिशेने कूच करत आहे. त्यामुळे आता होणारे सामने काही संघांसाठी ‘करो या मरो’ असेच असतील. बुधवारी चेन्नई सुपर किंग्जची दिल्ली कॅपिटल्सशी टक्कर होणार आहे. या मोसमात एकीकडे चेन्नई प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करत सातत्याने पुढे जात असताना दिल्लीने या मोसमात ‘प्ले ऑफ’साठी पात्र ठरण्याच्या त्यांच्या आशांना जवळपास पूर्णविरामच लागला आहे. तरीही जर-तरच्या समीकरणावर अवलंबून राहायचे असल्यास दिल्लीच्या संघाला चेपॉक येथे चेन्नईला कोणत्याही किमतीत पराभूत करावे लागेल. मागील सामन्यात दिल्लीने आरसीबीच्या हातून विजय हिसकावून घेतला हे विसरता येणार नाही. हे पाहता दिल्लीला कमी लेखणे चेन्नईला महागात पडू शकते.
धोनीच्या नेतृत्वाखाली यलो आर्मीने शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत केले. त्याचवेळी दिल्लीनेही आरसीबीचा ७ विकेट राखून पराभव केला. चेन्नई सुपर किंग्ज यंदा चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पहिल्या सामन्यात दारूण पराभव पत्करल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने शानदार पुनरागमन केले. दुखापतीतून पुनरागमन करत दीपक चहरने गत सामन्यात शानदार गोलंदाजी केली. त्याचवेळी तुषार देशपांडे आणि पाथिराना यांनीही धुमाकूळ घातला. फिरकीमध्ये रवींद्र जडेजा आणि महिष तिक्षाना ही जोडी फलंदाजांना अडचणीत आणण्यात यशस्वी ठरली आहे. चेन्नईच्या ताफ्यात तुषार देशपांडे, मथिशा पाथिराना, महिष तिक्षाना, रवींद्र जडेजा या गोलंदाजांचा समावेश आहे. ज्यांनी आपल्या गोलंदाजीने चांगलीच छाप पाडली आहे. त्यामुळे दिल्लीला सावध राहावे लागेल. फलंदाजीत ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी सीएसकेला दमदार सुरुवात करून देण्यात यश मिळवले आहे. त्याचबरोबर शिवम दुबेनेही आपल्या झंझावाती फलंदाजीने खूप प्रभावित केले आहे. धोनी आणि जडेजाने खालच्या फळीत चांगलीच रंगत आणली आहे. मधल्या फळीत फलंदाजीसाठी अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू आणि शिवम दुबे यांचा पर्याय संघाकडे आहे. या तिन्ही खेळाडूंनी आपल्या बॅटची ताकदही दाखवली आहे. सीएसकेच्या तळातील क्रमवारीत, एमएस धोनी आणि मोईन अली फिनिशिंग टच देण्यात ‘माही’र आहेत.
दुसरीकडे सुरुवातीच्या काही झटक्यांनंतर दिल्ली विजयी मार्गावर परतली आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी शेवटचे दोन सामने उत्कृष्ट राहिले. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली दिल्लीने गुणतालिकेत अव्वल असलेल्या गुजरात आणि आरसीबीला पराभूत केले आहे. डेव्हिड वॉर्नरसोबत फलंदाज फिल सॉल्टची बॅट जबरदस्त चालत आहे आणि त्याने बंगळूरुविरुद्ध ४५ चेंडूंत ८७ धावांची स्फोटक खेळी खेळली. त्याचवेळी मिचेल मार्शही फॉर्ममध्ये परतला आहे. गोलंदाजीत इशांत शर्मा नव्या चेंडूवर प्रभावी दिसत असून अक्षर पटेल आणि कुलदीप यादव फिरकी विभागात धावांवर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी ठरले आहेत. चेन्नईविरुद्ध अक्षर पटेलकडून अष्टपैलू कामगिरीची आशा आहेत. कारण हा सामना चेन्नईच्या खेळपट्टीवर खेळवला जाणार आहे आणि तिथे त्याची फिरकी गोलंदाजी प्रभावी ठरू शकते. तसेच फलंदाजीतही तो योगदान देऊ शकतो. अशा स्थितीत गुजरात आणि आरसीबीनंतर चेन्नईविरुद्धही दिल्ली धक्कादायक निकालाची नोंद करते का हे बुधवारीच कळेल.
ठाणे : उन्हाळ्याला सुरुवात झाली असून वाढत्या तापमानानुसार पाण्याच्या पातळीत घट होत चालली आहे. अशातच…
बीजापूर : छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यातील घनदाट जंगलात मागील ४८ तासांपासून गोळीबार सुरू आहे. बीजापूर जिल्हा…
सीमेवर हालचाली वाढल्या, गावं रिकामी केली; सैन्याच्या सुट्ट्याही रद्द... भारत हल्ला करणार या भीतीने पाकिस्तानची…
उन्हाळ्याच्या (Summer) हंगामात घट्ट शूजऐवजी सँडल (Sandals) घालणे खरोखरच आरामदायक आहे. उन्हाळ्याच्या उष्णतेमध्ये शरीराला थंड…
लेले, मोने आणि जोशी परिवाराने सांगितला तिथे घडलेला सर्व थरार मुंबई : काश्मीरच्या निसर्गरम्य खोऱ्यात…
नवी दिल्ली : मंगळवार २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे…