नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी शिक्षक भरती

मुंबई : नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी शिक्षक भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, "पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात जवळपास 20 हजार शिक्षकांची भरती केली जाईल."


विद्यार्थ्यांचे आधार वेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती संदर्भात नेमका आकडा कळेल. शंभर टक्के शिक्षक भरती होणार आहे. आरक्षणानुसार ही पद भरती होणार असल्याने संच मान्यता झाली पाहिजे, असं ते म्हणाले. या उमेदवारांच्या मुलाखती होऊन त्यांची भरती केली जाईल. शिक्षकांच्या बदलीसंदर्भात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितलं.


तसंच विद्यार्थ्यांच्या एकच युनिफॉर्मबाबतचा निर्णय यावर्षी घ्यायचा की पुढल्या वर्षी घ्यायचा या संदर्भात एक ते दोन दिवसात विचार करु आणि त्यानंतर ठरवू असं दीपक केसरकर यांनी स्षष्ट केलं. यासाठी कुठलीही ऑर्डर पैसे ट्रान्सफर केले नसल्याचं त्यांनी सांगितलं. यामध्ये महिला बचत गटांना काम मिळवून देण्याचे शासनाचे धोरण आहे. तसंच स्काऊट गाईड, एनएसएस कंपल्सरी करण्यात येणार आहे. त्यांना एक पर्टिक्युलर युनिफॉर्म दिला तर गणवेशाचा डबल खर्च होणार नाही, असा हेतू त्यामागे आहे. बूट सुद्धा विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येतील.

Comments
Add Comment

यंदाच्या छठ पुजेत विरोधही होणार मावळ, काय आहे कारण...

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी यंदा छठ पुजेच्या निमित्ताने

महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी १९,३१७ नवीन टॅबची खरेदी

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले टॅब आता जुने झाल्याने नव्याने

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना सवलतीच्या दरात वीज

मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज सवलतीची केली घोषणा मुंबई : राज्य

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक