अमृतसर : पंजाबमधील अमृतसरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी स्फोट झाला. सुवर्ण मंदिराजवळ सकाळच्या सुमारास स्फोट झाला. हा स्फोट बॉम्बमुळे झाला की अन्य कशामुळे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण सर्वात मोठी बाब म्हणजे हा स्फोट सलग दुसऱ्या दिवशी झाला आणि सुवर्ण मंदिराजवळच झाला.
मध्यरात्री झालेल्या स्फोटानंतर सकाळी सुवर्ण मंदिराजवळील हेरिटेज स्ट्रीटवर स्फोट झाला. मात्र, हा दुसरा स्फोट किरकोळ असल्याचा दावा करण्यात आला. आश्चर्याची बाब म्हणजे, एक दिवस आधी (रविवारी) जिथे स्फोट झाला. त्याच ठिकाणी आज सकाळी (सोमवारी) स्फोट झाला. सोमवारची सकाळ असल्याने कमी वर्दळीमुळे या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर शनिवार आणि रविवार दरम्यान रात्री झालेल्या स्फोटामध्ये सहा जण जखमी झाले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेरीटेज स्ट्रीटवरील एका रेस्टॉरंटच्या चिमणीत आधी स्फोट झाला होता. त्या स्फोटाप्रमाणेच हा स्फोट असावा. जवळपास त्याच ठिकाणी हा दुसरा स्फोट झाला आहे.