पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

पुलवामा : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला आहे. पोलिसांनी इशफाक नावाच्या व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडून ५ ते ६ किलो आयईडी जप्त करण्यात आले. या प्रकरणी राज्य पोलिसांनी ओजीडब्ल्यू इश्फाक अहमद वानी याला ताब्यात घेतले. ओजीडब्ल्यूला पुलवामाच्या अरिगाम भागातून शोध मोहिमेदरम्यान अटक केली. पकडलेल्या दहशतवादी सहकाऱ्याच्या खुलाशाच्या आधारे, ५ते ६ किलो वजनाचा पूर्वनिर्मित आयईडी जप्त करण्यात आले. येत्या काही दिवसांत जी २० बैठकीपूर्वी सुरक्षा दलांच्या वाहनांवर हल्ला करण्यासाठी आयईडीचा वापर केला जाणार असल्याने मोठी दुर्घटना टळली, असे पोलिसांनी सांगितले. सध्या या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Comments
Add Comment

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३

जहाज उद्योग, वाहतूक, आरोग्य, संरक्षण, आर्थिक क्षेत्रात भारत आणि रशिया दरम्यान करार, मोदी - पुतिन चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत

रशियन रुबेल आणि रशियन रुबेल मध्ये कितीचे अंतर?

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काल (४ डिसेंबर) भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुतिन यांचा हा

'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' विधेयक मंजूर झाल्यास काय बदल होणार? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी 'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय