Wednesday, April 23, 2025
Homeसाप्ताहिककोलाज‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा तिसरा सीझन येतोय..

‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा तिसरा सीझन येतोय..

  • ऐकलंत का!: दीपक परब

‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा या बहुचर्चित वेबसीरिजचा पहिला आणि दुसरा भाग सीझन प्रचंड गाजला होता. त्याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळाली. राजकारणाची पार्श्वभूमी असलेली ही वेबसीरिज कायमच चर्चेचा विषय ठरलेली पाहायला मिळाली. त्यानंतर आता प्रेक्षकांच्या आग्रहाखातर लवकरच याचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सत्तेसाठीची भूक, विश्वासघात आणि शक्तिशाली गायकवाड हे लवकरच ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या तिसऱ्या सीझनद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सीझनमध्ये गुंतागूुतीची पात्रं, वैयक्तिक संबंध आणि काही अनपेक्षित ट्वीस्ट पाहायला मिळणार आहेत. ‘सिटी ऑफ ड्रीम्स सीझन ३’ यात राजकारणामध्ये सत्ता मिळवण्याकरिता अंतिम लढा असणार आहे. लवकरच ही सिरीज डिस्ने + हॉटस्टारवर पाहता येणार आहे.

सिटी ऑफ ड्रीम्सच्या तिसऱ्या सीझनमध्ये आपल्याला अनेक दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहेत. या वेबसीरिजमध्ये प्रिया बापट ही पौर्णिमा आम्रे-गायकवाड हे पात्र साकारताना दिसत आहे. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा पहिला सीझन १३ मे २०१९ रोजी प्रदर्शित झाला होता. या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री प्रिया बापटसोबतच अतुल कुलकर्णी, सचिन पिळगावकर, सुशांत सिंग, एजाज खान, रणविजय सिंग प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. मराठी कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे ही सीरिज प्रचंड गाजली होती. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ ही मालिका नागेश कुन्नूर यांनी दिग्दर्शित केली होती. ही एक राजकीय ड्रामा सीरिज आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -