Monday, July 15, 2024
Homeक्रीडाIPL 2024दिल्लीपुढे बंगळूरुने टेकले गुडघे

दिल्लीपुढे बंगळूरुने टेकले गुडघे

कॅपिटल्सचा ७ विकेट राखून विजय

दिल्ली (वृत्तसंस्था) : फिल सॉल्टच्या धडाकेबाज ८७ धावांमुळे दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुवर शनिवारी सोपा विजय मिळवला. अक्षर पटेल आणि मिचेल मार्श यांनी अप्रतिम गोलंदाजी करत बंगळूरुला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले.

बंगळूरुने दिलेल्या १८२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरूवात चांगली झाली. दिल्लीचे सलामीवीर डेव्हीड वॉर्नर आणि फिल सॉल्ट यांनी पहिल्या गड्यासाठी ६० धावांची भागीदारी केली. सहाव्या षटकात डेव्हीड वॉर्नरला २२ धावांवर बाद करत जोश हेझलवूडने ही भागीदारी मोडली. त्यानंतर सॉल्ट आणि मिशेल मार्शने डाव पुढे नेत दुसऱ्या गड्यासाठी ५९ धावा जोडल्या. मार्शला २६ धावांवर बाद करत अकराव्या षटकात अक्षर पटेलने ही जोडी फोडली. दरम्यान सॉल्टने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर सॉल्ट आणि रिले रुसोने संघाला विजयाच्या जवळ नेले. विजयासाठी अवघ्या ११ धावांची गरज असताना सोळाव्या षटकात कर्ण शर्माने फिलिप सॉल्टला ८७ धावांवर बाद केले. मात्र तोपर्यंत विजय दिल्लीच्या आवाक्यात आला होता. त्यानंतर अक्षर पटेल आणि रिले रुसोने संघाला विजयी धावसंख्या गाठून दिली.

प्रथम फलंदाजी करताना बंगळूरुला विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी अपेक्षित सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी ८२ धावांची भागीदारी केली. अकराव्या षटकात फाफ डु प्लेसिसला ४५ धावांवर बाद करत मिशेल मार्शने ही जोडी फोडली. मार्शने नंतर लगेचच ग्लेन मॅक्सवेललाही शून्यावर बाद केले. यानंतर विराटने लोमरोरच्या साथीने डाव पुढ नेला. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी ५५ धावांची भागीदारी केली. सोळाव्या षटकात मुकेश कुमारने विराटला ५५ धावांवर बाद केले. अखेर लोमरोर आणि अनुज रावतने २० षटकांत संघाची धावसंख्या १८१ वर पोहोचवली. खलिल अहमद दिल्लीचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकांत ४५ धावा देत एक
विकेट मिळवली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -