किल्ले रायगड संवर्धनाचे काम संथगतीने सुरू

अलिबाग (प्रतिनिधी) : किल्ले रायगडच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असला तरी, भारतीय पुरातत्त्व विभागाकडून किल्ला जतन व संवर्धनाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. १९ पैकी केवळ २ कामेच विभागाने पूर्ण केली असून असून, साडेआठ कोटींचा निधी वापराविना पडून आहे. त्यामुळे पर्यटक आणि शिवप्रेमींमध्ये नाराजीचा सूर आहे.



हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किल्ले रायगडाच्या जतन व संवर्धनासाठी राज्यसरकारने साडेसहाशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. किल्ल्याच्या जतन आणि संवर्धना बरोबरच या परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास या कार्यक्रमांतर्गत केला जाणार आहे. यासाठी रायगड प्राधिकरणाची स्थापना राज्यसरकारने केली आहे. रायगडसाठी बांधकाम विभागाचे विशेष स्थापत्य पथक नेमण्यात आले आहे. जेणेकरून किल्ला जतन, संवर्धन आणि सुशोभिकरणाची कामे जलद गतीने पूर्ण करता येणार आहे. पण तरीही गड जतन, संवर्धन आणि सुशोभीकरणाच्या कामांना गती मिळू शकलेली नाही.



कार्यकारी अभियंता विशेष स्थापत्य पथक रायगड यांच्या माध्यमातून २०१६ ते २०२३ पर्यंत एकूण १११ कामांना मंजुरी देण्यात आली होती. यापैकी केवळ ५० कामे पूर्ण झाली आहेत. ३८ कामे सध्या सुरू आहेत. २३ कामांना अद्याप सुरुवातही होऊ शकलेली नाही. किल्ला संवर्धनाचे काम भारतीय पुरातत्व विभागामार्फत केले जात आहे. यासाठी त्यांना ११ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. गड संवर्धनाच्या १९ कामांना मंजुरी मिळाली आहे. यापैकी केवळ दोन कामे पूर्ण झाली असून, १२ कामे प्रगतिपथावर आहेत. ४ कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही.



किल्ले रायगडावर यंदा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. २ जून ते सहा जून दरम्यान तिथी आणि तारखेनुसार या सोहळ्यांचे आयोजन केले जाणार आहे. त्यापूर्वी गडसंवर्धनाची कामे नेटाने गती देऊन पूर्ण करणे गरजेचे असणार आहे.


"किल्ला जतन करण्याची कामे हे कौशल्यपूर्ण होणे अपेक्षित आहे. गडाच्या मूळ ढाच्याला धक्का न लावता ही कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे पुरातत्त्व विभागाची अखत्यारीत असलेल्या कामे घाईगडबडीत होऊ शकत नाहीत. त्याला योग्य वेळ द्यावा लागेल. पण जास्त मनुष्यबळ लावून कामाची गती वाढवा, यासाठी पाठपुरावा करता येईल".
- रघुजीराजे आंग्रे, सदस्य रायगड प्राधिकरण.


"गडावरील संवर्धनाची कामे संथगतीने सुरू असून कामांचा वेग वाढवायला हवा. गडावर झालेल्या उत्खननात काय सापडले याचे अहवाल पुरातत्त्व विभागाने प्रसिद्ध करायला हवेत. ज्या अहवालांचा फायदा इतिहास अभ्यासक आणि संशोधकांना होऊ शकेल. गडसंवर्धनाच्या कामाचा वेग वाढायला हवा".
- डॉ. अंजय धनावडे, इतिहास अभ्यासक.

Comments
Add Comment

Satellite Phone: खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा; महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय

खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले

Kokan Railway : गणेशभक्तांसाठी रेल्वेची खास भेट! कोकण मार्गावर विशेष गाड्या आणि नवीन थांबे; पाहा पूर्ण वेळापत्रक

मुंबई : गणेशोत्सव (Ganeshotsav) अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला असताना कोकण (Konkan) गाठणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी

Mumbai Seaplane : मुंबई-रत्नागिरी सी-प्लेन सेवेला वेग; कोकण पर्यटनासाठी मोठे पाऊल

मुंबई : कोकणातील पर्यटनाला नवी चालना देण्यासाठी मुंबई (Mumbai) आणि रत्नागिरीदरम्यान (Ratnagiri) सी-प्लेन सेवा सुरू

Matsya Sampada Yojana : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ अधिकाधिक मच्छिमारांपर्यंत पोहोचवा; नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची (Matsya Sampada Yojana) प्रभावी अंमलबजावणी करून राज्यातील अधिकाधिक मच्छिमारांना

Vadkhal Bypass : वडखळ बायपासची दुरवस्था; अपूर्ण कामातच टोलवसुलीमुळे वाहनचालक संतप्त

रायगड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ बायपासची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, पावसाळ्यात हा

Matheran's Honeymoon Point : माथेरानच्या हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन; सीसीटीव्हीत थरारक दृश्य कैद

रायगड : माथेरानच्या प्रसिद्ध हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण