मुलुंड बस आगारातील उपाहारगृहाला टाळे

मुंबई (प्रतिनिधी) : बेस्टच्या मुलुंड पश्चिमेकडील मुलुंड बस आगारातील उपाहारगृह बुधवार ३ मेपासून अचानक बंद केल्यामुळे कर्मचाऱ्यांना बाहेर बसून जेवण्याची वेळ आली आहे. उपाहारगृहाचा कंत्राटदार सोडून गेल्याने व बेस्ट उपक्रमाने उपाहारगृहाला टाळे लावल्याने ही वेळ कर्मचाऱ्यांवर आली असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.



बेस्टच्या मुलुंड बस आगारातील कंत्राटदार हा अचानक कंत्राट सोडून गेल्याने व नवीन कंत्राटदार बेस्ट उपक्रमाने न नेमल्याने बेस्ट उपक्रमाने उपहारगृहाला टाळे लावले. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांना रस्त्यावर बसून व आगारातील इतर ठिकाणी बसून जेवण्याची वेळ आली. सध्या उपाहारगृहांची कोणतीही पॉलिसी नसल्याने व कंत्राटदारांना कठीण नियम लागू केल्याने कोणताही कंत्राटदार बेस्टसोबत काम करण्यास तयार नाही. कर्मचाऱ्यांचे होणारे हाल अधिकाऱ्यांना दिसत नाहीत का? कामगारांना इतकी वाईट वागणूक मिळत असेल, तर पुढे होणाऱ्या परिणामांचा उपक्रमाने विचार करावा, कामगारांचा अंत पाहू नये, मुलुंड बस आगार अधिकाऱ्यांनी सदर बाबीची दाखल न घेतल्यास होणाऱ्या आंदोलनाची सर्वस्व जबाबदारी उपक्रमाची राहील, याची नोंद घ्यावी, असा इशारा बेस्ट कामगार नेते सुनील गणाचार्य यांनी दिला.

Comments
Add Comment

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

मुंबई : राज्यातील 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज

फ्लिपकार्ट बीबीडी सेलमध्ये आधी ऑर्डर केला आयफोन, नंतर झाला रद्द

मुंबई : सध्या सुरू असलेल्या फ्लिपकार्ट बिग बिलियन डे (बीबीडी) सेल मध्ये आयफोन १६ आणि आयफोन १६ प्रो मॉडेल्ससाठी

घाटकोपर बेकायदेशीर जाहिरात फलक दुर्घटना; संबंधित विभागांना एक महिन्याच्या मुदतीत कार्यवाहीचे निर्देश

मुंबई : मुंबईमधील घाटकोपर येथे बेकायदेशीर फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या उच्च स्तरीय चौकशीसाठी स्थापन

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २ हजार २१५ कोटी मंजूर, नुकसानीच्या निकषांमध्ये शिथिलता मुंबई : अतिवृष्टी आणि

पाच लाखांपेक्षा अधिक खर्चाच्या उपचारांसाठी मिळणार मदत

मुंबई : विस्तारित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत

देशव्यापी सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाचा २५ सप्टेंबरपासून शुभारंभ

नागरिकांसाठी महिनाभर देशव्यापी सायबर सुरक्षा व गोपनीयता जनजागृती अभियान; नागरिकांना सायबर सुरक्षा व