'द केरला स्टोरी' विरोधातील ६ याचिका न्यायालयाने फेटाळल्या, कारण...

तिरुवनंतपुरम : 'द केरला स्टोरी' या चित्रपटात भारतात ‘लव जिहाद’ या दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदू मुलींचे वास्तव चित्रण करण्यात आले आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आदल्या दिवशी या चित्रपटाच्या विरोधात तब्बल सहा याचिका दाखल केल्याने न्यायालयाने तातडीने निर्णय देण्यास स्पष्ट नकार दिला.

५ मे रोजी प्रदर्शित होणारा 'द केरला स्टोरी' हा चित्रपट वादाच्या भोव-यात सापडला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यापासून ते शशी थरूरपर्यंत अनेक दिग्गजांनी या चित्रपटावर प्रश्न उपस्थित केले आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला आव्हान देणाऱ्या सहा याचिका काल केरळ उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. या याचिकांवर आता न्यायमूर्ती एन. नागेश आणि न्यायमूर्ती सोफी थॉमस यांच्या खंडपीठात सुनावणी होईल. सर्वोच्च न्यायालय आणि मद्रास उच्च न्यायालयाने याआधीच सुटका आणि बंदी घालण्याच्या या याचिका फेटाळून लावल्या आहेत.

याआधी चित्रपटाच्या रिलीजमुळे देशातील धार्मिक सलोखा आणि सार्वजनिक शांतता बिघडणार आहे, असा दावा करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. 'द केरला स्टोरी'वर बंदी घालण्याची मागणी यात करण्यात आली होती. न्यायमूर्ती ए डी जगदीश चंदीरा आणि न्यायमूर्ती सी सरवणन यांच्या सुटीकालीन खंडपीठाने ती फेटाळली.

प्रदर्शनाची तारीख दुस-या दिवशी असताना चित्रपटाविरोधी सहा याचिका दाखल झाल्याने सर्वोच्च न्यायालय व मद्रास उच्च न्यायालयाने त्या फेटाळून लावल्या. कोर्टाच्या म्हणण्यानुसार या याचिका चित्रपट न पाहता शेवटच्या क्षणी दाखल झाल्या. आधी आल्या असत्या तर कोणाला तरी चित्रपट बघून ठरवायला सांगता आले असते.
Comments
Add Comment

FDA Raid On KFC and Dominos : KFCमध्ये सडलेलं चिकन, Domino’sवरही कारवाई; ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना FDA चा दणका

FDA Raid On KFC and Dominos : महागड्या दरात खाद्यपदार्थ विकणाऱ्या मोठ्या फूड ब्रँड्सच्या अन्नगुणवत्तेवर पुन्हा एकदा

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र