पालघर (प्रतिनिधी) : जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या तहसीलदार कार्यालयात सामान्य नागरिकांना स्वच्छतागृहाची सोय नसल्याने त्यांना इतरत्र जावे लागते. त्यामुळे स्वच्छता गृहाची सोय तहसीलदार कार्यालय परिसरात केली पाहिजे, अशी जनतेकडून मागणी केली जात आहे.
या पूर्वी तहसीलदार कार्यालयातील पुरवठा अधिकारी कार्यालयाशेजारी स्वच्छतागृह होते, पण आता सामान्य नागरिकांसाठी ते कार्यालयाबाहेर सेवाभावी संस्थेने बांधले आहे. तेही तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बंद करून ठेवलेले असल्याने सामान्य नागरिकांना पंचायत समितीच्या स्वच्छता गृहा वापर करावा लागत आहे. तालुका पोलीस ठाणेही याच कार्यालयात असल्यामुळे येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे.
आपल्या विविध प्रकारच्या कामांसाठी पालघर तहसीलदार कार्यालयात बाहेरगावांहून येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी असते. आता शालेयपूर्व दाखल्यांसाठी नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहे. महिला तसेच वयोवृद्ध नागरिकांना स्वच्छतागृहाची आवश्यकता भासते. स्वच्छतागृह कुठे आहे? असे महिला विचारू शकत नाहीत. तहसीलदार कचेरीच्या शेजारी तालुका पंचायत समिती कार्यालयात असलेले स्वच्छतागृह हे वयोवृद्ध नागरिक आणि महिलांना लांब पडत असून तहसीलदार कार्यालयात कामासाठी येऊन स्वच्छता गृहासाठी तालुका पंचायत समिती कार्यालयात जावे लागत असल्याने नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे त्यांची नाराजीही आहे. महिला आणि वयोवृद्ध नागरिकांना स्वच्छतागृहासाठी शेजारच्या कार्यालायात जावे लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत.
मी माझ्या मुलीच्या दाखल्याचे काम असल्याने तहसील कार्यालयात आली होती, पण या कार्यालयात स्वच्छतागृहाची सोय नसल्याने गैरसोय झाली. कार्यालयाबाहेर असलेले स्वच्छतागृह बंद होते. मग एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला विचारले असता पंचायत समितीमध्ये जावे लागले.
– सुनीता ठाकूर, नागरिक, तारापूर
नागरिकांची सोय बाहेरील लायन्स क्लबने बांधलेल्या स्वच्छतागृहात करण्यात आली आहे. त्या स्वच्छतागृहात नळ आणि इतर सामान चोरी होत असल्याने ते सायंकाळी बंद करून सकाळी नागरिकांना खुले करण्यात येते. एखाद दिवस ते खोलण्याचे राहून गेले असेल.
– केशव तरंगे, निवासी नायब तहसीलदार, पालघर
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…