दिल्लीसाठी करो या मरो

तगड्या गुजरातला नमविण्याचे आव्हान


अहमदाबाद (वृत्तसंस्था) : दिल्ली कॅपिटल्सचा यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचा प्रवास निराशाजनक राहिला आहे. त्यांना स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी गुजरात टायटन्सविरुद्ध मंगळवारी होणाऱ्या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. या सामन्यात गुजरातचा संघ तगडा असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.


पृथ्वी शॉ, सरफराज खान यांच्यासह संघातील फलंदाजांना धावा जमवण्यात येत असलेल्या अपयशामुळे दिल्लीने आठपैकी सहा सामन्यांमध्ये पराभव पत्करला आहे. दिल्लीला आता प्ले ऑफ मध्ये प्रवेश करायचा असेल तर उर्वरित सर्व सहा सामन्यांमध्ये विजय मिळवणे आवश्यक आहे. परंतु संघातील खेळाडूंची कामगिरी पाहता दिल्लीची वाट बिकट आहे. कर्णधार डेविड वॉर्नर धावा जमवत आहे, परंतु त्याच्या आक्रमकतेची धार कमी झाली आहे. त्याचा फटका संघाला बसत आहे. चांगलाच फॉर्मात असलेल्या अक्षर पटेल, मनीष पांडे यांच्याकडून दिल्लीला अपेक्षा आहेत.


दुसरीकडे गुजरात सध्या चांगलाच फॉर्मात आहे. गुजरातने गत सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला १३ चेंडू राखून पराभवाचा चेहरा पहायला लावला. विजय शंकरने या सामन्यात डेविड मिलरसोबत सर्वश्रेष्ठ खेळी खेळली. गुजरातचा यंदाच्या हंगामातील प्रवास पाहिल्यास प्ले ऑफ मधील त्यांचे स्थान जवळपास निश्चित आहे. त्यांनी आठपैकी सहा सहा सामने आपल्या बाजूने वळवले आहेत. गुजरातला हरवणे कोणत्याही संघासाठी सोपे काम नसेल. एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहता दिल्लीविरुद्ध गुजरातचे पारडे जड मानले जात आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर गुजरातचा संघ सरस आहे. गोलंदाजीत राशिद खान आणि नूर अहमद चांगली भूमिका बजावत आहेत.

Comments
Add Comment

तिकीट काढूनही मेस्सीची झलक पाहायला मिळाली नाही; संतप्त चाहत्यांचा स्टेडियममध्ये तोडफोड

कोलकाता : GOAT India Tour अंतर्गत अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी १४ वर्षांनंतर भारतात आला. मेस्सीच्या

पंजाब किंग्सची धुरा श्रेयस अय्यरकडे?

रिकी पाँटिंगच्या अनुपस्थितीत संघ निवडण्याची जबाबदारीही येणार मुंबई  : बीसीसीआय सध्या आयपीएल २०२६ च्या मिनी

दुसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ‘पलटवार’

चंदिगड : मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारी खेळल्या गेलेल्या

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

कटकमध्ये भारताचा १०१ धावांनी विजय, दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव

कटक : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेत भारताने विजयाने शुभारंभ केला. भारताने कटकमध्ये झालेला सामना १०१

भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक

कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.