बंगळूरुची लखनऊवर सरशी

लखनऊ (वृत्तसंस्था) : विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसची दमदार सलामी आणि गोलंदाजांची अप्रतिम कामगिरी या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने लखनऊवर १८ धावांनी विजय मिळवला. अवघ्या १२७ धावांचा पाठलाग करणे लखनऊसारख्या तगड्या फलंदाज असलेल्या संघाला न जमल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.



प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या लखनऊच्या फलंदाजांनी निराश केले. कृष्णप्पा गोवथमने सर्वाधिक २३ धावा जमवल्या. लखनऊचे अन्य फलंदाज मात्र धावा जमवण्यात अपयशी ठरले. अमित मिश्रा आणि नवीन-उल-हक या जोडगोळीने गोलंदाजीसह फलंदाजीतही प्रमुख फलंदाजांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली. नवीन उल-हकने १३ धावा जोडल्या. अमित मिश्राने १९ धावा जमवत सामन्यात रंजकता आणली होती. परंतु अन्य फलंदाजांनी निराश केल्याने लखनऊचा संघ १९.५ षटकांत १०८ धावांवर सर्वबाद झाला. बंगळूरुच्या सांघिक गोलंदाजीचे दर्शन सोमवारी झाले. कर्ण शर्मा, जोश हेजलवूडसह त्यांच्या सर्वच गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली.



बंगळूरुचा ओपनर विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी चांगली सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी ६२ धावांची भागीदारी केली. नवव्या षटकात विराट कोहलीला ३१ धावांवर बाद करत रवि बिश्नोईने ही जोडी फोडली. त्यानंतर फाफने बंगळूरुचा डाव पुढे नेला. फाफ डु प्लेसीसने ४४ धावा केल्या. त्यानंतर मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा एकही फलंदाज मैदानात थांबू शकला नाही. दिनेश कार्तिकने केवळ १६ धावा केल्या. तो धावचित झाला. बंगळुरूला २० षटकांत ९ फलंदाजांच्या बदल्यात १२६ धावा करता आल्या. नवीन-उल-हकने ३, तर रवि बिश्नोई आणि अमित मिश्रा यांनी प्रत्येकी २ विकेट मिळवल्या.

Comments
Add Comment

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही जसप्रीत बुमराहच अव्वल

दुबई (वृत्तसंस्था): आयसीसीने बुधवारी त्यांची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप

महिला क्रिकेट विश्वचषक : भारतीय संघाला विजयी हॅट्ट्रिकची संधी

विशाखापट्टणम: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने

IND vs AUS : फक्त १० धावा करताच रोहित शर्मा रचणार इतिहास

पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI)

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून