Saturday, October 18, 2025
Happy Diwali

आधी कुणी ढुंकुनही बघत नव्हते आणि आता लागली लॉटरी

आधी कुणी ढुंकुनही बघत नव्हते आणि आता लागली लॉटरी

मुंबई : कोणाचे नशिब कधी पालटेल हे कोणीच सांगू शकत नाही. आता केदार जाधवच्या बाबतही तेच घडले आहे. लिलावात त्याच्याकडे कोणी ढुंकुनही बघत नसताना त्याला आयपीएलची लॉटरी लागली आहे.

यावर्षी केदार चांगल्या फॉर्मात दिसत नव्हता. त्यामुळे जेव्हा लिलाव झाला तेव्हा त्याच्यावर कोणीही बोली लावली नव्हती. त्यामुळे आता केदार काही यापुढे आयपीएलमध्ये दिसणार नाही, असे त्याच्या चाहत्यांना वाटत होते. त्यामुळे त्याचे चाहते निराश झाले होते. पण काही दिवसांपूर्वी डेव्हिड विलीला हा झाली. त्याची दुखापत ही गंभीर स्वरुपाची होती. त्यामुळे आता तो आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता डेव्हिड विलीच्या जागी केदार जाधवची निवड करण्यात आली आहे.

आरसीबीच्या संघाने आज हे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी डेव्हिड विलीच्या जागी आम्ही केदार जाधवला आरसीबीच्या संघात स्थान देत आहोत, असे म्हटले आहे. आता यात महत्वाचे म्हणजे केदार या संधीचा कसा फायदा उचलतो, हे पाहावे लागेल.

Comments
Add Comment