Friday, November 8, 2024
Homeक्रीडाIPL 2024हैदराबादची सरशी

हैदराबादची सरशी

दिल्लीवर ९ धावांनी मारली बाजी

दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिषेक शर्मा आणि हेनरिच क्लासेन यांची वादळी खेळी सनरायजर्स हैदराबादच्या विजयात शनिवारी महत्त्वाची ठरली. मयांक मार्कंडेने प्रभावी गोलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्सला विजयापासून ९ धावांनी दूर ठेवले.

प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर भोपळाही न फोडता माघारी परतला. त्यानंतर फिल सॉल्ट आणि मिचेल मार्श यांनी फलंदाजीची सूत्रे हाती घेत दिल्लीला चांगली सुरुवात करून दिली. या जोडीने शतकी भागिदारी साजरी केली. ही जोडी सेट झाल्याने दिल्लीच्या विजयाच्या आशा अधिक होत्या. परंतु ५९ धावा करणारा फिल रॉल्ट बाद झाल्यानंतर दिल्लीच्या फलंदाजीला गळती लागली. पुढच्याच षटकात नवखा फलंदाज मनीष पांडे स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर ६३ धावा करणाऱ्या मार्शचाही संयम सुटला. तळात अक्षर पटेलने २९ धावांची फटकेबाजी केल्याने दिल्लीला निर्धारित षटकांत ६ फलंदाजांच्या बदल्यात १८८ धावांपर्यंतच मजल मारता आली. हैदराबादच्या मयांक मार्कंडेने ४ षटकांत २० धावा देत २ बळी मिळवले.

अभिषेक शर्मा याचे वादळ आणि क्लासेनच्या झंझावाताच्या बळावर सनरायजर्स हैदाराबादने निर्धारित २० षटकांत सहा विकेटच्या मोबदल्यात १९७ धावांपर्यंत मजल मारली. अभिषेकने ३६ चेंडूंत ६७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १२ चौकार आणि एक षटकार लगावला. अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर क्लासेनने फलंदाजीची सूत्रे हातात घेतली. त्याने अब्दुल समदसोबत ३३ चेंडूंत ५३ धावांची भागिदारी केली. अब्दुल समद बाद झाल्यानंतर अकिल हुसेनच्या साथीने हैदराबादच्या डावाला फिनिशिंग टच दिला. क्लासेनने २७ चेंडूंत नाबाद ५३ धावांची झंझावाती खेळी केली. या खेळीत त्याने चार षटकार आणि दोन चौकार लगावले. अब्दुल समदने २१ चेंडूंत २८ धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने दोन षटकार लगावले. अकिल हुसेनने १० चेंडूंत नाबाद १६ धावांची खेळी केली. दिल्लीकडून मिचेल मार्शने भेदक मारा केला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत मिचेल मार्शने चार षटकांत २७ धावा खर्च करत चार विकेट घेतल्या. मिचेल मार्शने एक निर्धाव षटक टाकले. अक्षर पटेलने ४ षटकांत २९ धावा देत एक विकेट घेतली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -