Sunday, September 14, 2025

अंबाजोगाई बाजार समितीवर धनंजय मुंडेंची एकहाती सत्ता

अंबाजोगाई बाजार समितीवर धनंजय मुंडेंची एकहाती सत्ता

परळी : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई बाजार समितीच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वातील पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासाठी हा निकाल धक्कादायक मानला जात आहे.

अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ पैकी १५ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. विरोधी भाजपला फक्त तीन जागा मिळाल्या आहेत. अंबाजोगाई हे परळी आणि केज विधानसभा मतदारसंघ अंतर्गत संयुक्त आहे.

Comments
Add Comment