
बंगळुरु : कर्नाटक निवडणुकीत सत्ताधारी पक्ष भाजप आणि विरोधी पक्ष काॅंग्रेस यांच्यामध्ये पलटवार होत आहेत.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना ‘विषारी साप’ असं म्हटलं. त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून कर्नाटकचे भाजप आमदार बासनगौडा यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना ‘विषकन्या’ म्हटलं आहे.
“संपूर्ण जगाने पंतप्रधान मोदींना स्वीकारलं आहे. एकेकाळी व्हिसा देण्यास नकार दिलेल्या अमेरिकेने नंतर रेड कार्पेट अंथरून मोदींचं स्वागत केलं. आता खरगे त्यांची तुलना कोब्रा सापाशी करत आहेत आणि तो विष टाकेल असा दावा करीत आहेत. पण खरगे ज्या पक्षात आहेत त्या पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी विषकन्या आहे. त्यांनी चीन आणि पाकिस्तानबरोबर त्यांचे एजंट म्हणून काम केलं आहे,” असं विधान आमदार बासनगौडा यांनी केलं आहे. पुढे ते असेही म्हणाले की, खरगेंच्या पक्षातील नेते नेहमीच पंतप्रधान मोदींची चहावाला, दुर्योधन, गटारातील किडा, मौत का सौदागर अशा शब्दांत हेटाळणी करतात. लोकशाहीत अशा शब्दांचा कधीच वापर करु नये.