Sunday, October 26, 2025
Happy Diwali

उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाच्या वतीने खानदेश महोत्सवाचे आयोजन

उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाच्या वतीने खानदेश महोत्सवाचे आयोजन

कल्याण : दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाच्या वतीने २८ एप्रिल ते १ मे पर्यंत खानदेश महोत्सवाचे आयोजन कल्याण पश्चिमेतील मुंबई विद्यापीठ उपविभाग मैदान, वसंत व्हॅली येथे करण्यात येणार आहे. या महोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, साहित्यिक कार्यक्रम असतील. त्यासोबत वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करणा-यांना खानदेश भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

महोत्सवात खवय्यांसाठी खानदेशातील कडी हुणके, खापरावरची मांडी असे विविध प्रसिध्द खाद्य पदार्थ असणार आहेत.  शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणे, महिला बचत गटांना संधी देणे हा उद्देश ग्लोबल खानदेश महोत्सव आयोजित करण्यामागे असल्याचे अध्यक्ष विकास पाटील यांनी सांगितले. यावेळी खजिनदार ए. जी. पाटील, सल्लागार अण्णा पाटील, महिला मंडळ अध्यक्ष भारती वानखेडकर, सांस्कृतिक प्रमुख विनोद शेलकर, प्रदीप अहिरे, वर्षा पाटील, सुनिता बोरसे, विद्या अहिरे, यश महाजन, रतिलाल कोळी, ठानसिंग पाटील, विजय पाटील, विनोद शिंदे, मिलिंद बागुल, प्रभाकर बोरसे इत्यादी उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा