Saturday, May 24, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

राज्याचे नवे मुख्य सचिव कोण होणार?

राज्याचे नवे मुख्य सचिव कोण होणार?

मुंबई : राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव येत्या २८ एप्रिलला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे या पदावर वर्णी लावण्यासाठी ‘आयएएस’मधून जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. मात्र यासंदर्भात अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सल्ल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत.


मनुकुमार श्रीवास्तव यांनी मुदतवाढ न मागता, पाच वर्षांचा कालावधी असलेल्या सेवा आयुक्तपदासाठी अर्ज करून तेथे निवडले गेले आहेत. त्यामुळे २९ एप्रिलपासून राज्याचे मुख्य सचिव पद रिक्त राहणार आहे.


याआधी श्रीवास्तव यांची नवीन सीएस म्हणून निवड करताना ज्येष्ठतेला स्पष्टपणे प्राधान्य दिले होते. सेवाज्येष्ठतेनुसार मनोज सौनिक, डॉ. नितीन करीर आणि सुजाता सौनिक यांचा या पदावर दावा असेल.


मात्र सुजाता आणि मनोज सौनिक नात्याने पतिपत्नी आहेत. दोघे अधिकारी सेवाज्येष्ठतेत वरचे असले, तरी महाराष्ट्राबाहेरचे आहेत. त्यामुळे डॉ. नितीन करीर यांना संधी मिळू शकेल, अशा चर्चा आहेत.

Comments
Add Comment