Thursday, June 12, 2025

अजिंक्यचे वादळ, दुबे-कॉनवेची तुफान फटकेबाजी

अजिंक्यचे वादळ, दुबे-कॉनवेची तुफान फटकेबाजी

मुंबईकरांच्या जीवावर चेन्नईची मजा, कोलकात्यावर ४९ धावांनी विजय


कोलकाता (वृत्तसंस्था) : अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे या दोन्ही मुंबईच्या खेळाडूंनी केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे चेन्नईने कोलकात्यावर ४९ धावांनी सहज विजय मिळवला. आपल्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर दोघांनीही केकेआरच्या गोलंदाजांना लोटांगण घालायला भाग पाडले. या दोघांच्या झंझावाती फटकेबाजीच्या जोरावर चेन्नईला २३५ धावांचा डोंगर उभारता आला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरपुढे चेन्नईच्या गोलंदाजांनी अचूक मारा केला आणि हा सामना ४९ धावांनी सहजपणे जिंकला.


चेन्नईला यावेळी दमदार सुरुवात करून दिली ती डेव्हॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड यांनी. या दोघांनी सुरुवातीपासून धडाकेबाज फटकेबाजी केली. त्यामुळेच चेन्नईच्या संघाला ७.३ षटकांत ७३ धावांची सलामी मिळाली. केकेआरचा फिरकीपटू सुयश शर्माने यावेळी ऋतुराजला बाद केले आणि चेन्नईला पहिला धक्का दिला. ऋतुराजने यावेळी २० चेंडूंत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ३५ धावांची खेळी साकारली. ऋतुराज बाद झाला असला तरी कॉनवे सुंदर फटकेबाजी करत होता आणि त्याला यावेळी सुयोग्य साथ मिळाली. अजिंक्य रहाणेच्या वादळी खेळीच्या बळावर चेन्नईने निर्धारित २० षटकात २३५ धावांपर्यंत दमदार मजल मारली. अजिंक्य रहाणे, डेवेन कॉनवे आणि शिवब दुबे यांनी अर्धशतकी खेळी केली. तर ऋतुराज गायकवाड आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रभावी फलंदाजी केली. चेन्नईच्या फलंदाजांनी रविवारी षटकारांचा पाऊस पाडला. चेन्नईने तब्बल १८ षटकार लगावले आणि १४ चौकार मारले.


नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईची दमदार सुरुवात झाली. डेवेन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड यांनी ७३ धावांची सलामी दिली. गायकवाड याने २० चेंडूत ३५ धावांचे योगदान दिले. ऋतुराज गायकवाड याने तीन षटकार आणि दोन चौकार लगावले. गायकवाड बाद झाल्यानंतर कॉनवे आणि रहाणे यांनी आक्रमक फलंदाजी केली. डेवेन कॉनवे याने ४० चेंडूत ५६ धावांचे योगदान दिले. या खेळीत कॉनवेने चार चौकार आणि तीन षटकार लगावले. कॉनवे आणि रहाणे यांनी २८ चेंडूत ३६ धावांची भागिदारी केली. कॉनवे बाद झाल्यानंतर रहाणे आणि शिवम दुबे या महाराष्ट्राच्या जोडीने कोलकात्याच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. या जोडीने चारी बाजूने फटकेबाजी केली. रहाणे आणि शिवम दुबे यांनी ३२ चेंडूत ८५ धावांची भागिदारी केली. तर अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जाडेजा यांनी १३ चेंडूत ३८ धावांची भागिदारी केली.


शिवम दुबे याने २१ चेंडूत ५० धावांचे वादळी योगदान दिले. या खेळीत दुबे याने पाच षटकार आणि दोन चौकार लगावले. शिवम दुबे आणि अजिंक्य रहाणेपुढे कोलकात्याची गोलंदाजी कमकुवत जाणवत होती. खजोरीयाने शिवम दुबेला बाद केले. पण दुसऱ्या बाजुला अजिंक्य रहाणेची वादळी खेळी सुरुच होती. अजिंक्यने अवघ्या २९ चेंडूत नाबाद ७१ धावांची खेळी केली. या खेळीत रहाणेने पाच षटकार आणि सहा चौकार लगावले. रहाणे याने कोलकात्याच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. जाडेजानेही आठ चेंडूत १८ धावांचे योगदान दिले. रविंद्र जाडेजाने दोन खणखणीत षटकार लगावले.


कोलकात्याकडून कुलवंत खजोरीया याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. पण खजोरीया याने तीन षटकात ४४ धावा खर्च केल्या. वरुण चक्रवर्तीने चार षटकात ४९ धावा दिल्या. सुयेश शऱ्मा याने कंजूष गोलंदाजी केली. सुयेश शर्मा याने चार षटकात फक्त २९ धावा खर्च करत एक विकेट घेतली. उमेश यादवने तीन षटकात ३५ धावा दिल्या. डेविव वाईस याने तीन षटकात ३८ धावा दिल्या. नारायण याने दोन षटकात २३ धावा दिल्या. आंद्रे रसेल याने एक षटकात १७ धावा खर्च केल्या.

Comments
Add Comment