सिंंधू आजी आता खरं तरं थकली होती. संसाराचा गाडा तिने एकटीनेच अनेक वर्षे ओढला होता. कारण, तिची तीन मुले लहान असताना तिचे पती देवाघरी गेले होते. मग ती त्यांना घेऊन माहेरी आली. तिच्या वडिलांनी त्यांच्या घराजवळ एक वेगळी खोली तिला विकत घेऊन दिली. तिच्या भावाने एक शिलाई मशीन घेऊन दिली. आता पिको-फॉल, फ्रॉक शिवणे अशी कामे सिंधूला येऊ लागली. दिवस भरभर पळत होते. नशिबाने सिंधूची तीनही मुले अभ्यासात हुशार निघाली. त्यांना चांगल्या नोकऱ्या लागल्या. त्यांचे संसार सुरू झाले. सिंधूला कृतकृत्य वाटले. आपल्या कष्टांचे सार्थक झाले असे समजून ती जरा निश्चिंत झाली. अर्थातच मुलांनी वेगवेगळे संसार थाटले. प्रत्येक लेकाकडे आईने चार-चार महिने काढायचे असे ठरले. त्याशिवाय पर्याय नव्हता. कारण प्रत्येकाचे वाढते संसार, मुले-बाळे. त्यामुळे भावांची घरे वेगवेगळे झाली. आई थकत चालली, तशी कुणा एका मुलाकडे मुक्काम करावा अशी तिची इच्छा होऊ लागली. ही इच्छा आईने बोलून दाखविली. तरी मुले आपापला टर्न होताच आईला पुढील भावाकडे पाठवून देत. अशी मानसिक कुचंबणा सहन करत आई दिवस ढकलत होती. डोळ्यांतील अश्रू पुसत होती. नशीब एवढेच की मुले आईला सांभाळत होती.
समाज परिवर्तनीय आहे. त्यामुळे काही घटनांना दुःखाची किनार असते, तर काहींना सुखाची किनार असते. आम्ही नेदरलँड्समधील ॲमस्टर डॅम या ठिकाणी साधारण एक वर्ष राहायला होतो. तेव्हा तेथे दर बुधवारी आमच्या घराजवळील एका मॉलच्या पुढे वृद्धांना नेण्यासाठी एक बस यायची. वॉकरने चालत, व्हीलचेअरवरून ही वृद्ध मंडळी बसपाशी यायची. मला उत्सुकता वाटू लागली. चौकशी केल्यावर समजले की, दर बुधवारी सरकारतर्फे वृद्धांना फिरवून आणण्यासाठी ही बस येते व संध्याकाळी त्यांना ती पुन्हा मॉलपाशी आणून सोडते.
परदेशात छोटी कुटुंब व्यवस्था आहे. त्यामुळे वृद्धांची जबाबदारी सरकारच पेलवते, असे मला माझ्या तिथल्या मैत्रिणींनी सांगितले. भारत देश हा नाही परदेशांएवढा पुढारलेला आहे व नाही भरपूर मागासलेला आहे. त्यामुळे परदेशांमध्ये वृद्धाश्रमांत राहण्याची लोकांच्या मनाची तयारी खूप आधी झालेली असते. तिथे जवळपास वयाच्या अठराव्या वर्षांपासून मुले शिक्षणासाठी बाहेर पडलेली असतात. या सर्व व्यवस्थांची तिथल्या लोकांना सवय आहे. आपल्याकडेही अनेक मध्यमवर्गीय कुटुंबातून तरुण वयातील उच्चशिक्षित मुलं-मुली नोकरीसाठी परदेशी जातात, अनेकदा लग्न करून तिथेच स्थायिक होतात. मागे उरतात ते त्यांचे आई वडील.
सुरुवातीला हा सुटसुटीतपणा सर्वांना हवाहवासा वाटतो; परंतु आई-वडिलांचे वय वाढत जाते तसे ते धास्तावतात. पुढे आपल्या दोघांना परस्परांची जबाबदारी पेलवेल का? या विचाराने त्रस्त होतात. पुन्हा परदेशात आपल्या मुलाच्या संसारात जाऊन राहाणे त्यांना उपऱ्यासारखे वाटू लागते. कधीतरी तीन-चार महिने हौसेने परदेशात त्यांच्यासोबत राहून दिवस मजेत घालविणे ठीक आहे, पण आई-वडिलांची पूर्ण जबाबदारी कोण घेणार? बाहेरून जेवणाचे डबे आणून एकाकी वृद्धापकाळ घालवणारी ही जोडपी नंतर कंटाळून जातात. जोडीदारांपैकी एकाची साथ सुटली की, तर रिकामे घर खायला उठते. मी असे एक एकटे राहणारे अनेक वृद्ध पाहिले आहेत. सोसायटीत सिक्युरिटी, सीसीटीव्ही सर्व काही आहे, पण प्रेमाचा ओलावा, मानसिक आधार देणारी आपली मुले-बाळे जवळ नाहीत तर संसार शुष्क वाटू लागतो. भारतात जवळपास अंदाजे दीड कोटींहून अधिक वृद्ध एकाकी जीवन जगत आहेत.
शंतनू नायडू या व्यक्तीचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्याकडे येणे-जाणे असे. टाटांसोबत ते भरपूर वेळ घालवत. आधुनिक काळानुरूप टाटांना येणाऱ्या अडचणी ते सोडविण्याचा प्रयत्न करत. यातून त्यांना वृद्धांशी मैत्री जोडण्याची कल्पना सुचली व ‘गुड फेलोज’ नावाची संस्था स्थापन केली. हल्ली अनेक वृद्ध एकलकोंडेपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. त्यातून त्यांना नैराश्य येते. त्यासाठी त्यांच्यासोबत गप्पा करणे आवश्यक आहे. त्यांची सुखदुःखे जाणून घेणे गरजेचे आहे. या गोष्टीचे महत्त्व जाणून व काळाला अनुरूप गरज समजून रतन टाटा यांनी या संस्थेला आर्थिक गुंतवणूक केली आहे. “आम्हाला मनासारखे जगण्याचे स्वातंत्र्य हवे”, असे जर वृद्ध व युवा अशा दोन्ही पिढ्या म्हणत गेल्या तर त्यांच्यातील जनरेशन गॅप वाढत जाणार. अशा वेगवेगळ्या कारणांचा विचार करून काही शहरात केअर सेंटर्स उघडले गेले आहेत. तेथे कुटुंबीय आपल्या वृद्ध मंडळींना ठेवतात. कोरोना काळात जेव्हा इकडून-तिकडे प्रवास करणे अशक्य होते, तेव्हा हिंडू फिरू न शकणाऱ्या वृद्धांनी अशा केअर सेंटरचा आधार घेतला होता.
“मुलगा परदेशातून ऑनलाइन पैसे दरमहा माझ्यासाठी केअर सेंटरला पाठवतो व मी इथे दिवस काढतोय”, असे एक आजोबा मला सांगत होते. “फक्त मोबाइलवर मुलाचा आवाज ऐकून समाधान मानावे लागते”, असे ते म्हणायचे. आता कोरोनानंतर वातावरण स्थिरस्थावर झाल्यावर मुलाने आपल्या वडिलांना परदेशात स्वतः जवळ नेले आहे.
लहानपणी दूरदर्शनवर एक भावपूर्ण नाटक पाहिले होते. नाटकाचा थोडक्यात आशय असा होता की, एका कुटुंबातील वृद्ध आजी-आजोबांना त्यांचा मुलगा व सून वृद्धाश्रमात ठेवायला निघतात, तेव्हा त्यांचा मुलगा घरातील गोधडीचे दोन भाग करतो. त्यातला एक भाग तो आपल्या आजी-आजोबांना देतो. तेव्हा त्याचे वडील त्याला म्हणतात, “अरे, आजी-आजोबांना पूर्ण गोधडी द्यायची ना? कापलीस कशाला ती?” तेव्हा मुलगा म्हणतो, “आई-बाबा, तुम्ही म्हातारे झाल्यावर मी या गोधडीतला उरलेला भाग तुम्हाला वृद्धाश्रमात ठेवताना देणार आहे.” खूप अंतर्मुख करणारी ही कथा. शेवटी आम्हाला कोण? असा प्रश्न मुलाच्या आई-वडिलांना पडला आणि त्यांचे डोळे उघडले.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…